Atal Bihari Vajpayee : मानव सेवा संस्थेची अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

खंडेराव महाराज मंदीर सभागृहात आज मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील सोळा जेष्ठ नागरिकांना 'जीवन गौरव पुरस्कार २०१८' देवून गौरविण्यात येणार होते. मात्र भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम स्थगित करुन संस्थेच्या वतीने शोकसभा घेण्यात आली.

वणी (नाशिक) : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना येथील मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभा घेत संस्थेच्यावतीने आयोजित केलेला आजचा (ता. १७) 'जीवन गौरव पुरस्कार २०१८' स्थगित करण्यात आला आहे.

येथील खंडेराव महाराज मंदीर सभागृहात आज मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील सोळा जेष्ठ नागरिकांना 'जीवन गौरव पुरस्कार २०१८' देवून गौरविण्यात येणार होते. मात्र भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम स्थगित करुन संस्थेच्या वतीने शोकसभा घेण्यात आली. यावेळी प्रमोद पाटील, बापुसाहेब शिंदे, जनाब पठाण, किशोर बोरा, अॅड. विठ्ठल उगले, अॅड. विजय कोतवाल, अॅड. फरहाद पठाण यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयी मनोगत व्यक्त करीत श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. दिपक देशमुख, जमिर शेख, आबा मोर यांच्यासह जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी, महिला मंडळ, वणी, खेडले, करंजवण येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. पठाण यांनी आजचा रद्त करण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमाची तारीख निश्चित करुन कळविण्यात येणार असल्याचे सांगत उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी शोकसभेचे संयोजन केले.

Web Title: manav seva santha payed tribute to Atal Bihari Vajpayee