माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक भगवान गिरासेंचा आत्महत्येचा प्रयत्न

girase
girase

तळोदा - नंदुरबार लोकसभेचे माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक भगवान गिरासे यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती नाजूक असून, या घटनेमुळे नवापूर व नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

भगवान गिरासे हे मुंबईहून बेपत्ता झाले होते. १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवापूर रेल्वे स्थानकावर दिसले.  भगवान सुखरूप घरी परतले होते. चार दिवसांपासून कोणाजवळ काही बोलत नव्हते परिवारासोबत देखील कमी बोलत होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक राहत्या घरात त्यांनी गळफास घेतला. घरातील सदस्यांनी लगेच त्यांना पकडले दोरी कापली आणि तात्काळ नवापूर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गिरासे यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांनी  गळफास घेण्याचे कारण असून समजू शकले नाही.

३० मार्च शनिवार रोजी मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्ष श्रेष्ठिच्या भेटीसाठी माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित आपल्या परिवारा सोबत पक्षश्रेष्ठी यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक भगवान गिरासे देखील हजर होते. भेटीनंतर संपूर्ण परिवार दादरहुन निघत असताना भगवान गिरासे यांनी तीन गाडया रवाना ही केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर काही वेळात ते बेपत्ता झाले. बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांची शोध मोहीम सुरु झाली. परंतु, त्याचा मोबाइल बंद दाखवत असल्याने दादर येथील पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com