मनीषा कोईरालाला निसर्गरम्य नाशिकची भुरळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नाशिक - "सौदागर' या 1991 मधील पहिल्या हिंदी चित्रपटापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोइरालाला निसर्गरम्य नाशिकने भुरळ घातली आहे. काठमांडूमध्ये नेपाळच्या राजघराण्यात जन्मलेल्या मनीषाचे पशुपतिनाथ हे श्रद्धास्थान असून, ती कुटुंबीयांसमवेत श्रावणानिमित्त त्र्यंबकेश्‍वरला दर्शनासाठी आली होती. 

मनीषाचे वडील प्रकाश, आई सुषमा, मावशी, काका यांच्यासमवेत मंगळवारी (ता. 21) रात्री तिचे नाशिकमध्ये आगमन झाले. नाशिकचा परिसर निसर्गराजीने फुलून गेला असल्याने कुटुंबीयांशी संवाद साधताना त्यांनी नेपाळचे "फिलिंग' येत असल्याचे सांगितले, तिने सांगितले. मनीषा दुपारी त्र्यंबकेश्‍वरला रवाना झाली. 

Web Title: Manisha Koirala attracts natural beauty of Nashik