मनमाड - ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’चा अनेकांना लाभ

mnmd.
mnmd.

मनमाड - राज्य शासन राबवित असलेल्या ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात १२,७५,९१७ कुटुंबे लाभासाठी पात्र ठरली तर गंभीर आजाराने ग्रस्त ७१०५५ रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी ३२७,७०,८३,४२४/- रुपये खर्च करण्यात आल्याने ही योजना आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी’ ठरत आहे 

‘आरोग्यम धनसंपदा‘ या उक्ती प्रमाणे प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ व निरोगी हवे मात्र मानवाच्या प्रगती बरोबर दिवसेंदिवस नवनवीन आजारही वाढत आहे गोरगरिब, आर्थिक दुर्बल रुग्णांना आजारांवरील उपचारांचा खर्च महागाईमुळे परवड नाही कमाई कमी आणि उपचाराचा खर्च जास्त त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे गोरगरिबांना आजारपणात उपचारासाठी आर्थिक आधार मिळावा उपचारा अभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासन ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ राबवत आहे या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात शासकीय व खासगी २६ रुग्णालय आहे या रुग्णालयांमध्ये सुमारे १२,७५,९१७ कुटुंबे लाभासाठी पात्र ठरली आहे तर २०१३ ते २०१८ या वर्षात ६९,४१३ लाभ घेतले लाभार्थी असून गंभीर आजाराने ग्रस्त ७१०५५ आर्थिक दुर्बल रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यासाठी ३२७,७०,८३,४२४/- खर्च करण्यात आले आहे विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना नातेवाईकांकडून एकही रुपया घेता येत नाही त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी वरदान व जीवनदायी ठरत आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले आहे या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील एक लाखा पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबियांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रति वर्षी विम्याचा हप्ता शासन मार्फत अदा केला जातो तसेच प्रतिवर्षी दीड लाख रुपयांची हमी दिली जात आहे या योजने अंतर्गत बाराशे आजारांवर उपचार केले जातात १२७ सेवांची फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो व ३१ विशेष सेवांचा समावेश करण्यात येतो आणि रूग्णांना सर्व सेवा निशुल्क दिल्या जातात विमा रक्कमेच्या मर्यादेत कुटूंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ घेता येतो 

नाशिक जिल्ह्यात समावेश असलेले  रुग्णालय - २६
शासकीय रुग्णालय - ३
सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल - ४
नाशिक शहरातील रुग्णालय - १७
तालुक्याच्या ठिकाणची रुग्णालय - ९

जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेली रुग्णालय
नाशिक - १७
मालेगाव - ४
निफाड - २
दिंडोरी - १
इगतपुरी - १
येवला - १
एकूण - २६

लाभ घेतलेले एकूण कुटुंब - ११,९२,००८
पिवळे कार्डधारक - ५,७४,००१
अंतोदय कार्डधारक - १,८०,२१३
केशरी कार्डधारक - ४,३७,०१५
अन्नपूर्णा कार्डधारक - ७७९
एकूण कुटुंब - ११,९२,००८

सफेद कार्डधारक - ८३,९०९
एकूण - १२,७५,९१७

नाशिक जिल्ह्याच्या २६ रुग्णालयातील वर्षांनुसार रुग्ण संख्या व खर्च करण्यात आलेली रक्कम 
वर्ष २०१३ - रुग्ण ५४७ - रक्कम - २,१३,८१,८२०/-
वर्ष २०१४ - रुग्ण ७८०८ - रक्कम - ३३,८४,४३,११६/- 
वर्ष २०१५ - रुग्ण १२१५१ - रक्कम - ५१,५८,९९,३३१/-
वर्ष २०१६ - रुग्ण १७४२० - रक्कम - ८०,४७,६३,८८२
वर्ष २०१७ - रुग्ण २१३५३ - रक्कम - १०१,३१,१५,४४२/-
वर्ष २०१८ - रुग्ण १०१३४ - रक्कम - ५८,३४,७९,३३३/-

आजार व उपचार घेतलेल्यांची संख्या
१) कार्डिओलॉजी - १०६४०
२) जेनिटोयुरिनरी सिस्टीम - १०३४५
३) मेडिकल ओनकॉलॉजी - ७७४८
४) रेडिएशन ओनकॉलॉजी - ७५४९
५) कार्डियक अँड कार्डियोथोरासिक सर्जरी - ६५०७
६) पॉली ट्रॉमा - ४९३६
७) सर्जिकल ओनकॉलॉजी - ३९७३
८) पेडियाट्रिक्स मेडिकल मॅनेजमेंट - ३१८८
९) अर्थोपेडिक सर्जरी अँड प्रोसेजर्स - २६१४
१०) नेफ्रॉलॉजी - २३५६
११) ईएनटी सर्जरी - २०८५
१२) पेडियाट्रिक्स सर्जरी - १९०२
१३) न्यूरॉसर्जरी - १५६०
१४) गाय्नोकोलोजी अँड ओब्स्टेट्रिक्स सर्जरी - ११०४
१५) जनरल सर्जरी - १००७
१६) न्यूरॉलॉजी - ८५५
१७) क्रिटिकल केअर - ५०५
१८) इंटरवेशनल रेडिओलॉजी - ४५०
१९) बर्न्स - ३८८
२०) गेस्ट्रोइंट्रोलोजी - ३१२
२१) जनरल मेडिसिन - २९२
२२) एंडोक्रिनोलॉजी - १९१
२३) पल्मोनोलॉजी - १५४
२४) सर्जिकल गेस्ट्रो एंन्टेरोलॉजी - १५४
२५) ओप्थाल्मोलॉजी सर्जरी - १४९
२६) प्लास्टिक सर्जरी - ८८
२७) डरमेटोलॉजी - ३
एकूण - ७१०५५

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात राबवली जात असून गंभीर आजाराने ग्रस्त ७१०५५ आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे मूळ रेशन कार्ड व कुठलेही ओळखपत्र सोबत घेऊन मान्यताप्राप्त रुग्णालयात जाऊन गरजू रुग्णांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा 
-डॉ वैभव बच्छाव, जिल्हा समन्वयन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com