आगपेट्या घेऊन जाणारा ट्रक आगीत भस्म

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

मनमाड - येथून जवळ असलेल्या चोंडी शिवारात मनमाड-मालेगाव मार्गावर आगपेट्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रक पूर्ण जळून खाक झाला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दुतर्फा वाहतूक काही तास ठप्प झाली होती. अग्निशामक दलाचा बंब दाखल झाल्याने शर्तीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मनमाड-मालेगाव रस्त्यावर असलेल्या चोंडी जळगावच्या शिवारात आज पहाटे तमिळनाडू येथून आगपेट्या घेऊन जयपूरकडे ट्रक जात होता; मात्र या ट्रकमध्ये असलेल्या ज्वलनशील आगकाड्यांच्या घर्षणामुळे आगपेट्यांनी पेट घेतला. चोंढी येथे असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाजवळच ही घटना घडली; मात्र ट्रक पेटत असताना ट्रकचालकाने धाडस दाखवत साहसाने जळता ट्रक काही अंतर पुढे नेत उभा केला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला.

Web Title: manmad nashik news truck fire