manmad.
manmad.

मनमाड - जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारल्याने रेल्वेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी 

मनमाड - पाणीटंचाईचे शहर असलेल्या मनमाडमध्ये रेल्वे प्रशासनाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारल्याने रेल्वेच्या वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करत वाया जाणाऱ्या लाखो लिटर 'पाण्याची बचत' करून मनमाड रेल्वे स्थानकाने राज्यात स्वतःचा आदर्श निर्माण केला आहे या रेल्वे स्थानकाचा आदर्श घेऊन इतरही रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनातर्फे असे प्लँट उभारले जात आहे

मनमाड म्हटले की भीषण  पाणी टंचाई डोळ्यासमोर येते २० दिवसाआड पाणीपुरवठा येथे होतो पाणी नसले की पाण्यासाठी नागरिकांना वन-वन भटकावे लागते अवर्तनाच्या पाण्यासाठी पोलीस संरक्षण घ्यावे लागते अशा गंभीर परिस्थितीत पाण्याची बचत करण्याचे मोठे आवाहन शहरापुढे आहे मात्र हे आवाहन मनमाड नगर पालिके ऐवजी मनमाड रेल्वे प्रशासनाने पेलले आहे जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारून पाणी बचतीचा एक अभिनव उपक्रम पूर्ण केला आहे मध्य रेल्वे मध्ये मनमाड जंक्शन एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आशा चारही बाजूने ११८ गाड्या दररोज येजा करतात तर दररोज सुमारे १२ ते १३ हजार प्रवाशी या स्थानकावर उतर चढत करतात त्यामुळे भुसावळ मंडळात सर्वात व्यस्त स्थानक असल्याने पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला होतो शहरासह रेल्वेलाही पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन दिले जाते पाटोदा येथे रेल्वे साठवण तलावातुन पंपिंग करून हे पाणी रेल्वे स्थानकाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये घेतले जाते मात्र हे अवर्तनाचे पाणीही रेल्वेला पुरत नसल्याने पाणीटंचाईचा सामना शहरासह रेल्वेलाही करावा लागतो काहीवेळा रेल्वे स्थानकावरही पिण्याचे पाणी नसते अशी अवस्था होऊन जाते अशावेळी स्थानकाला वापरण्यासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडतो

रेल्वे स्थानकावर वापरलेले पाणी नालीद्वारे सांडपाण्याच्या मोठया नाल्याने नदीनाल्याला सोडून दिले जायचे मात्र हे घाण सांडपाणी असेच वाया जात असल्याने रेल्वे प्रशासनाने पाणीटंचाई आणि पाण्याचे महत्व जाणून हे वाया जाणारे पाणी पुन्हा वापरात यावे यासाठी गर्डर शॉप जवळ जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारले बाजूच्या नाल्यातून घाण पाणी घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते पाणी  शुद्धीकरण केंद्रात नाल्यातील गढूळ पाणी विशिष्ट प्रक्रियेच्या साह्याने शुद्ध करण्यात येते स्कीन चेम्बर्स, ग्रीट चेम्बर्स, ऑइल, ग्रीस टॅप, फ्लॅश मिक्सर, फ्लाॅकुलेटर, प्रायमरी सेटलिंग टँक, एस एफ रिअक्टर, सेकंडरी सेटलिंग टँक, स्लज इत्यादी प्रक्रिया पाणी शुद्ध करण्यासाठी येथे वापरल्या जाते  शुद्ध झालेल्या पाण्याचा उपयोग फलाटा ची, रेल्वे रुळाची सफाई, रेल्वेच्या डब्यांना साफ करणे, झाडांना पाणी देणे, वाॅशबेल अॅप्रोनची सफाई इत्यादी ठिकाणी या पाण्याचा वापर केला जातो या जल पुनःशुद्धीकरण केंद्रातून दररोज सुमारे ५ लाख लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे या उपक्रमातून प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते या कामांसाठी याआधी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर केला जायचा मात्र ही केंद्रे सुरू झाल्यावर रेल्वेचा पाणीसाठा वाचला आहे या केंद्राचा आदर्श घेऊन शेगाव, बडनेरा, भुसावळ, दौंड आदी ठिकाणी राज्यात प्रकल्प उभारले जात आहे 

मनमाड शहरात पाणी टंचाई असल्याने रेल्वे प्रशासनालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे रेल्वेने जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारून वाया जाणारे सांडपाणी प्रक्रिया करून पाणी पुनःवापरात आणले आहे यामुळे रेल्वे स्थानकावर वापरण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे
-डी.व्ही.बी. राव, सहायक मंडल अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com