PHOTOS : गावपण हरवलय 'या' गावाचं...कारण असं की..

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

महापालिका क्षेत्रातील गाव मानूर. शेतकरी शेतात राहायला गेले असून, बाहेरून स्थलांतरित झालेले गावात राहतात. त्यामुळे गावाचे गावपण हरवलेले दिसते. दोन हजार लोकसंख्येच्या गावात लक्ष्मीआई, मारुती, विठ्ठल-रुखमाई, गणपती आणि महादेव अशी मंदिरे आहेत. या गावाला पूर्वी दगडी कोट आणि वेस होती. आता ते दिसत नाही. घर बांधण्यासाठी त्याचा वापर केल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

नाशिक : महापालिका क्षेत्रातील गाव मानूर. शेतकरी शेतात राहायला गेले असून, बाहेरून स्थलांतरित झालेले गावात राहतात. त्यामुळे गावाचे गावपण हरवलेले दिसते. दोन हजार लोकसंख्येच्या गावात लक्ष्मीआई, मारुती, विठ्ठल-रुखमाई, गणपती आणि महादेव अशी मंदिरे आहेत. या गावाला पूर्वी दगडी कोट आणि वेस होती. आता ते दिसत नाही. घर बांधण्यासाठी त्याचा वापर केल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

Image may contain: outdoor

Photo : महापालिकेची प्राथमिक शाळा ( सर्व छायाचित्रे - आनंद बोरा)

हेही वाचा > टोपी उतरवून शर्ट इन केला...अन् गुरगावच्या आलिशान हॉटेलमधून 'हे' आमदार पडले बाहेर....

दशरथ राजांच्या पंचक्रिया विधीची दंतकथा 

गावात पूर्वी मारुती मंदिराचा यात्रोत्सव व्हायचा. इथे महापालिकेची प्राथमिक शाळा आहे. तसेच हरिनाम सप्ताहाचा सुवर्णमहोत्सव झाला आहे. दवाखाना, वाचनालय आणि व्यायामशाळा मात्र इथे नाही. नांदूर नाका परिसरातील अहिल्याबाई होळकरांच्या काळातील बारव असून, बारवेचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. भगूरच्या रेणुकामाता मंदिरासमोरील बारवेचे जसे संवर्धन केले, तसे इथल्या बारवेचे संवर्धन होऊ शकते. गावात 47 वर्षांपासून भजनी मंडळ आहे. प्रभाकर माळोदे, सोमनाथ हांबरे, नामदेव माळोदे, नारायण माळोदे आदींचा त्यात सहभाग असतो. नारायण माळोदे, खंडू सूर्यवंशी हे मल्ल पंचक्रोशीत ओळखले जायचे. तसेच अशोक बोरसे, संतू माळोदे हे मल्ल इथले आहेत. 

No photo description available.

Photo : मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती.

क्लिक करा > "ती' विवाहित, तरीही ती तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या प्रेमात पडली.. अन् मग

चित्रपटांचे चित्रीकरणामुळे फेमस
"धडक', "फक्त सातवी पास' या मराठी चित्रपटांचे गावात चित्रीकरण झाले आहे. गावात जुने वड आणि पिंपळाचे डेरेदार वृक्ष आहेत. संजय राठोड हे वादक, विश्‍वसंत श्री तुकोबाराय सेवाभावी ट्रस्ट गावात आहे. ट्रस्टच्या माध्यमातून गावात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. गावात गटार योजना राबविण्यात आली नाही. विकासकामे न झाल्याबद्दलची नाराजी ग्रामस्थांमध्ये आहे. पिण्याच्या पाण्याची सत्तर वर्षांपूर्वीची पाइपलाइन असल्याने अशुद्ध पाणी प्यावे लागते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. नांदूर, मानूर, दसक, पंचक, माडसांगवी या गावांचे ऋणानुबंध घट्ट आहेत. दशरथ राजाच्या पंचक्रिया विधीसाठी हनुमानरायांनी अस्थी आणल्याची दंतकथा सांगितली जाते. इथल्या सर्वपल्ली राधाकृष्णन प्राथमिक विद्यामंदिर शाळेने छानसे स्वच्छतागृह उभारले आहे. 

आवर्जून वाचा > #SpecialReport : राष्ट्रवादीच्या "डॅमेज कंट्रोल'मध्ये "आर्मस्ट्रॉंग' रणनीती..2002 मधील बंड मोडून काढण्यातील अनुभव पडला उपयोगी 

गावात पूर्वीसारखा यात्रोत्सव सुरू व्हायला हवा

आमच्या गावात दक्षिणमुखी मारुती असून, प्रभाकर माळोदे यांच्या मार्गदर्शनासाठी भजनी मंडळ सुरू आहे. नदीजवळ घाट बांधल्यास पर्यटनास चालना मिळेल. गावात पूर्वीसारखा यात्रोत्सव सुरू व्हायला हवा. - यशवंत पाटील, ग्रामस्थ 

गावात अपेक्षित विकासाची कामे झाली नाहीत. मला घरकुल न मिळाल्याने कर्ज काढून घर बांधले. गावात दवाखाना, वाचनालय आणि व्यायामशाळा होणे आवश्‍यक आहे. त्याच वेळी जुनी पाइपलाइन बदलून शुद्ध पिण्याचे पाणी मिळायला हवे. - विश्राम माळोदे, ग्रामस्थ 

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manur village story of Nashik Marathi News