सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

सिडकोमध्ये अनेक ठिकाणी इमारतीला लागूनच विद्युत पोल टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या वीजतारांच्या धक्कयाने मृत्यूमुखी पडलेल्या सासू-सुन सोबतच आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी एका रिक्षाचालकाचाही करंट लागून बळी गेला होता. रविवारी (ता.२९) दोघे भाऊ-बहीण यामुळे गंभीर जखमी झाले. 

नाशिक : सिडको उत्तमनगर येथे केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोषी धरत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून मृतांच्या नातेवाईकांनी अद्याप मृतदेब ताब्यात घेतला नाही.

इमारतीला लागूनच विद्युत पोल

सिडकोमध्ये अनेक ठिकाणी इमारतीला लागूनच विद्युत पोल टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या वीजतारांनी आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी एका रिक्षाचालकाचाही करंट लागून बळी गेला होता. रविवारी (ता.२९) दोघे भाऊ-बहीण यामुळे गंभीर जखमी झाले. 

वीजतारा भूमिगत करा : नागरिक

 या वीजतारा भूमिगत कराव्यात अशी मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांनी लावून धरली आहे. परंतु स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आज ठिय्या आंदोलन केलं आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many peoples died due to electricity shock