वैविध्यपूर्ण तोरणमाळांनी सजली दुकाने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नागपूर, ता. 27 : घरसजावट करायची असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाते ते तोरणाला. या तोरणमाळांचे विविध आकर्षक प्रकार बाजारात ग्राहकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. टेडीबेअर टेडीबेअर पास तो आयो, असे म्हणत वैविध्यपूर्ण टेडीबेअरकडे सजावटीसाठी विशेष लक्ष जात आहे.

नागपूर, ता. 27 : घरसजावट करायची असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाते ते तोरणाला. या तोरणमाळांचे विविध आकर्षक प्रकार बाजारात ग्राहकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. टेडीबेअर टेडीबेअर पास तो आयो, असे म्हणत वैविध्यपूर्ण टेडीबेअरकडे सजावटीसाठी विशेष लक्ष जात आहे.

दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली असली तरी, महिलांची सजावट अजून सुरूच आहे. विविध आकर्षक वस्तू या गृहसजावटीसाठी खरेदी करणाऱ्यांची गर्दी बाजारात दिसू लागली आहे. मातीपासून बनविलेल्या आणि नाजूक नक्षीकामाने आकर्षक "लुक' घेतलेल्या विविध वस्तूंना शहरात मागणी वाढली आहे. याशिवाय विविध फुलझाडे, लाकडी हॅण्डमेड वस्तू, शोपीस, टेडीबेअर असे एक ना अनेक पर्याय घर सजावटीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत.

घरातील हॉल सजावटीसाठी खिडक्‍यांना नवे पडदे, सोफा कव्हर, दिवाणवरील लोड, तक्के यांनाही नवे कव्हर खरेदी होत आहेत. याव्यतिरिक्त घरातील एखाद्या कोपऱ्याला उजळविण्यासाठी आकर्षक हॅंगिंग लाईट आणि यासोबत सुंदर वॉलपीस लावले जाते. एखाद्या कोपऱ्यात चौरंग अथवा छोटे टेबल घेऊन त्याभोवती काढण्यासाठी सुंदर रेडिमेड रांगोळी खरेदी केली जात आहे. चौरंगावर तांब्याचे, पितळेचे किंवा काचेचे भांडे ठेवून त्यामध्ये फ्लोटिंग पणत्या लावून, त्यांच्या आजूबाजूला पाण्यामध्ये तरंगती फुले ठेवण्याच्या सजावटीलाही अलीकडे पसंती मिळत आहे.

जादूच्या दिव्याचे आकर्षण
मातीचे विविध फॅन्सी झुंबर तसेच घरांमध्ये, झाडावर व तुळशीजवळ लावण्याचे विविध प्रकारच्या दिव्यांमध्ये यंदा जादूचा नवा दिवा बाजारात आला आहे. या दिव्यात तेल टाकण्यासाठी खालच्या बाजूने छिद्र असून, तेल टाकल्यानंतर दिव्यातून तेल गळत नाही, हे या दिव्याचे मुख्य आकर्षण आहे. 80 ते 120 रुपयांपर्यंत हा दिवा बाजारात उपलब्ध आहेत.

आकर्षक शोभेच्या वस्तू
राजस्थानी कलाकृतीच्या आकर्षक लहान फुलदाणी, कछुवा फुलदाणी, लहान-मोठ्या आकारातील नारळ व गॅस हंडीच्या आकारातील पैसे जमविण्याचा गल्ला, अंगणात तुळशीपुढे लावण्याचे नवीन प्रकारातील दिवे, पक्ष्यांचे मातीचे पिंजरे, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी झाडावर टांगले जाणारे भांडे, झुंबर, कंदील, रांगोळ्या ठेवण्याचे कळस, पूजा थाली, कमळपात्र, देवी, सूर्याचे मुखवटे अशा विविध वस्तू आकर्षक डिझाइनमध्ये बाजारात आल्या आहेत.

 

Web Title: Many types of Toranamal diverse shops