काश्‍मीरप्रश्‍नांची नक्षली चळवळीशी तुलना अयोग्य - व्ही. के. सिंह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नाशिक - काश्‍मिरातील प्रश्‍न व नक्षली चळवळ हे वेगवेगळे विषय आहेत. त्यांची परस्परांशी तुलना अयोग्य आहे. त्यामुळे मी तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे नक्षली चळवळीविरोधात लष्करी बळ वापरण्यास विरोध दर्शविला होता, असा दावा केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केला. 

ते म्हणाले, काश्‍मीरमध्ये जाणीवपूर्वक असंतोष निर्माण केला गेला आहे. नक्षली दहशतवादाचा विषय वेगळा आहे. त्यांचा व्यवस्थेविरोधातील लढा आहे. त्यांची परस्परांशी तुलना योग्य नाही. त्यामुळेच चिदंबरम यांनी सांगूनही, मी त्या वेळी नक्षलीविरुद्ध लष्करी कारवाई करण्यास नकार दिला होता. नक्षली हे ही शेवटी भारतीय आहेत. लष्कराने आपल्याच लोकांविरुद्ध बळ वापरणे चूक आहे, असा दावा केला. 

सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविण्याच्या घटनेबाबत त्यांनी, तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेली लष्करी कारवाई इतिहासातला काळा अध्याय होता. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविण्याच्या घटनेमुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Maoist movement in Kashmir questions than inappropriate