वाईन चक्क आंघोळीसाठी

representational image
representational image

लासलगाव: वाइनचा आजपर्यंत पिण्यासाठी वापर होत असे. पण वाइनच्या प्रमोशनसाठी आता वाइन प्यायला नव्हे, तर चक्क अंघोळीसाठी वापरा, असा अजब सल्ला इंडिया ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने दिला गेला. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, इंडिया ग्रेप हार्वेस्ट व वाइन इन्फॉर्मेशन सेंटर, विंचूर यांच्यातर्फे विंचूर येथे इंडिया ग्रेप हार्वेस्ट या फेस्टिव्हलला 10 व 11 फेब्रुवारीला पर्यटकांनी गर्दी केली होती. 
वाइनबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, वाइनचा आरोग्यासाठी कसा उपयोग आहे हे दाखविण्यासाठी व पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी हा फेस्टिव्हल झाला. त्यासाठी वेगळेपण म्हणून वाइनमध्ये अंघोळ, वाइनचा धबधबा व शॉवर असे उपक्रम राबविले. संयोजकांच्या मते हे सगळे विनोथेरेपी म्हणून परदेशामध्ये प्रसिद्ध आहे व त्याचा प्रचार आता भारतात करण्यासाठी या फेस्टिव्हलचा वापर झाला. लोक आता फक्त वाइनचा ग्लास हातात घेऊन पिणे जुने झाले आहे तर लोक आता वाइनने अंघोळ करण्याचे स्वप्न बघत असल्याचा दावा संयोजकांनी केला. 

अखिल भारतीय वाइन उत्पादक संघ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यात 9 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत इंडिया ग्रेप हार्वेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते रणजित यांनी सध्या फॅशनमुळे "व्हीलन'चे काम आता कमी झाले आहे. त्यामुळे व्हिलनदेखील बदलत असल्याचे सांगत गीत गाऊन सामाजिक संदेश दिला. या फेस्टिव्हलमुळे नाशिकच्या पर्यटनात नक्कीच वाढ होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ज्युनिअर देवानंद यांनी "चलते चलते कभी अलविदा ना कहना' हे गीत गायिले. फेस्टिव्हलसाठी नाशिक, मुंबई, लासलगाव, निफाड, विंचूर येथील वाइन आणि संगीतप्रेमींची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यावेळी महिलांची गर्दी होती. 

वाइन शॉवर अन्‌ तलावाचे आकर्षण 

या फेस्टिव्हलसाठी पर्यटक म्हणून आलेल्या मुलींना या वाइन शॉवर व वाइनच्या तलावाचे फारच आकर्षण वाटत होते. हा एक अद्‌भुत अनुभव असल्याचे मत व्यक्त करीत सगळ्यांनी वाइनमध्ये डुंबण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही केले. काही मुलींनी आम्ही बाहेरगावहून खास येथे या फेस्टिव्हलसाठी आल्याचे सांगत असे कार्यक्रम येथे सतत व्हावेत, असे मत व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com