आमचा रमजान : गरीब रुग्णांना सेवा देण्यास प्राधान्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

जळगाव : मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजान महिना म्हणजे दानधर्माला अधिक प्राधान्य देणारा असतो. उत्पन्नातील अडीच टक्‍के रक्‍कम जकात म्हणून गरिबांना देऊन आर्थिक सहकार्य केले जाते. तसेच या पर्वात गरिबांना कपडे, अन्नधान्य देण्यासोबतच गरीब रुग्णांना सेवा देण्यास प्राधान्य देत असल्याच्या प्रतिक्रिया डॉक्‍टरांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केल्या. 

रमजान महिन्यात नियमित पंधरा तासांचा रोजाचा उपवास करतो. पहाटे तीनला सैनी केल्यानंतर सायंकाळी सातपर्यंत अन्न किंवा पाणी घेत नाही. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत, दानधर्म केला जातो. त्यानुसार घरी येणाऱ्या गरिबांना आपल्या कमाईतून मदत करत असतो. प्रामुख्याने विधवा महिला, अनाथ मुलांना कपडे देण्याचे नियोजन असते. शिवाय, डॉक्‍टर म्हणून गरीब रुग्णांसाठी जे करण्यासारखे आहे, ते निश्‍चित मदत स्वरूपात करणार. 
- डॉ. निकहत शेख. 
 
रमजानमधील उपवासाचे रोजे आंतरिक शुद्धीकरणासाठी महत्त्वाचे असतात. तसेच प्रत्येक वाईट गोष्टीपासून दूर राहण्यासाठी ही एक महिनाभराची "ट्रेनिंग' असते. कारण महिनाभरात वाईट काही करायचे नाही, ही शिकवण वर्षभर ठेवता येते. शारीरिक दृष्टीने पाहिल्यास आपल्या लिव्हरमध्ये जे अधिकचे फॅट जमा झालेले असतात, ते या महिन्यातील उपवासातून कमी होतात. तसेच पंधराव्या रोजापासून गरीब रुग्णांसाठी वेगवेगळे मोफत तपासणी शिबिर घेऊन मदतीचा हात दिला जाईल. 
- डॉ. मोइझ देशपांडे. 

रोजाचा उपवास करताना पहाटे नमाज पठण करतो. यानंतर खाणे- पिणे करून साडेचारपासून रोजाला सुरवात होते. यानंतर सायंकाळी सातपर्यंत काहीही खाणे- पिणे न करता आपले काम सांभाळत असतो. उत्पन्नातील अडीच टक्‍के जकात गरिबांसाठी मदत देत असतो. डॉक्‍टर असल्याने गरिबांना काही आरोग्य सेवा देता आली तर त्यानुसार नियोजन असते. 
- डॉ. शेख शाकीर शेख जमील. 
 
Web Title: mararthi news jalgaon ramjan helth