लंडन म्युझियममध्ये पाहिलेल्या पैठणीसाठी कॅम्लिन स्टेफी येवल्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

येवला :  महाराष्ट्रातील मराठी महिलांवर पैठणी वस्राचे अधिराज्य आहेच पण लंडनमधल्या दोन महिलांना देखील या पैठणीने अशीच भुरळ घातली...आणि मग सुरू झाला पैठणीच्या शोधाशोधचा प्रवास...लंडनच्या म्यूझियममध्ये पाहिलेली पैठणी मिळविण्यासाठी दोन परदेशी महिलांनी थेट येवल्यात येऊन गाठले ते भांडगे पैठणीचे शोरुम...

येवला :  महाराष्ट्रातील मराठी महिलांवर पैठणी वस्राचे अधिराज्य आहेच पण लंडनमधल्या दोन महिलांना देखील या पैठणीने अशीच भुरळ घातली...आणि मग सुरू झाला पैठणीच्या शोधाशोधचा प्रवास...लंडनच्या म्यूझियममध्ये पाहिलेली पैठणी मिळविण्यासाठी दोन परदेशी महिलांनी थेट येवल्यात येऊन गाठले ते भांडगे पैठणीचे शोरुम...
येवल्याची पैठणी कधीच सातासमुद्रापार गेली आहे.मात्र ज्यांनी ही पैठणी पाहिली त्यांनाच तिचे अप्रूप आहे. परदेशातील स्रियांना पैठणीचे देखणेपण कसे माहित होणार..लंडन येथील उद्योजिका स्टेफी वॅगनर व कॅमलिन जेन्सन यांनी लंडनमधील एका म्युझियममध्ये ब्रिटिशकालीन असलेल्या येथील देखण्या अस्सल पैठण्या पाहिल्या.या म्युझियममध्ये असलेल्या राजमाता जिजाऊंसह अनेक दिग्गज महिलांनी परिधान केलेल्या एक से बढकर एक देखण्या पैठण्यांची या दोघांना चांगलीच भुरळ पडली.

या मराठमोळ्या पैठण्यांची लंडनमधील मधून यांनी माहितीसह फोटो मिळवले आणि इतके देखणे वस्त्र कोठे मिळेल याच्या शोधात लंडनहुन गाठले पैठणीचे गाव.मुंबईत आल्यावर त्यांना अनेकांनी नाव सुचवले ते येथील पाच राष्ट्रपती पुरस्कारांची मोहोर उमटवलेले भांडगे पैठण यांचे..
या देखण्या साडीच्या कुतूहलापोटी मंगळवारी (ता.27) त्या येवल्यात पोहचल्या आणि भांडगे पैठणीच्या शोरूममध्ये येताच देखण्या साड्या पाहून अचंबित झाल्या.पैठणीची निर्मिती,तिचा धागा,गुंफण,नाजूक बारीक नक्षीकाम याची माहिती घेतली.त्यांनी लंडनमधील म्युझियमचे फोटो दाखवत अशीच पैठणी आम्हाला हवी अशी मागणी केली.येथील विणकरांनी साकारलेल्या आसावली डिझाइनची त्या दोघींना भुरळच पडली.

भांडगे पैठणीचे संचालक राजेश भांडगे तसेच महेश भांडगे यांनी येवला पैठणीच्या निर्मितीचा इतिहास त्यांना सांगितला. इथे कष्ट पद व देखणे विणकाम भारतामध्ये फक्त येवल्यात होत असल्याचेही भांडगे बंधूंनी त्यांना सांगत प्रत्यक्ष मागावर होत असलेल्या विनकामाची देखील माहिती दिली.फक्त हजारो नव्हे तर लाखो रुपयांच्या नजरेत साठाव्या इतक्या देखण्या पैठण्या पाहून कॅम्लिन व स्टेफी यांना पाच तासानंतरही येथून जाऊ वाटत नव्हते हे विशेष...!

“फक्त महाराष्ट्रातील,भारतातीलच महिलांत पैठणीचे आकर्षण नाही तर परदेशातील महिलांनाही येथील हे राजवस्र हवेहवेसे वाटत असल्याचे सिद्ध झाले आहे.या परदेशी महिलांनी देखण्या साड्या पाहताना व्यक्त केलेला आनंद अवर्णनीय होता. म्हणूनच खऱ्या जरीच्या साडय़ांची त्यांनी ऑर्डर दिलीव साड्याही खरेदी केल्या.”
-महेश भांडगे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विणकर

Web Title: marath news camlian and staffi in yeola