रुमचे भाडे कमी न केल्याने दोघांवर कटरने वार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

.नाशिक, : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वकीलवाडीतील पंचवटी हॉटेलमध्ये संशयित चालकाने मित्रांसाठी कमी पैशात रुम न दिल्याच्या कारणावरून दोघांवर कटरने वार करीत जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   वकीलवाडीमध्ये पंचवटी हॉटेल असून याठिकाणी चालक म्हणून संशयित जगन्नाथ मुळे (रा. गोविंदनगर, नाशिक) कामाला आहे. मंगळवारी (ता.10) मध्यरात्री बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित मुळे त्याच्या मित्रासह हॉटेलवर आला. त्यावेळी त्याने हॉटेलमध्ये काम करणारा प्रफुल्ल पवार (27, रा. विडी कामगारनगर, पंचवटी) याच्याकडे मित्रासाठी रूमची मागणी केली. रुमचे भाडे 600 रुपये असल्याने संशयित मुळे याने ती रुम 300 रुपयांमध्ये देण्याची गळ घालती.

प्रफुल्ल पवार याने रुमचे भाडे कमी करण्यास नकार दिला. संशयित मुळे यास प्रफुल्ल पवार याचा राग आला आणि तो त्याच्याशी वाद घालू लागला. वादाचे पर्यावसण धक्काबुक्कीमध्ये झाले. त्यावेळी संशयित मुळे याने त्याच्याकडील कटर काढून प्रफुल्ल पवार व त्याचा साथीदार या दोघांवर कटरने वार केले. यात दोघे जखमी झाले तर संशयित मुळे पसार झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: marath news cutter war

टॅग्स