एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला,गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक : नांदूर-दसक रोडवरील संत जनार्दन स्वामी पुलावर तिघांनी एकाच्या डोक्‍यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली. भास्कर लक्ष्मण गरड ऊर्फ पिंटू (रा. गजानन चौक, कोमठे गल्ली, पंचवटी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सागर अढांगळे उर्फ सॉप, किरण अढांगळे उर्फ आडू, आकाश गरड यांच्याशी बुधवारी (ता.11) भास्कर गरड याची वादावादी झाली होती. त्यानंतर रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास भास्कर हा नांदूर-दसक रोडवरील संत जनार्दन स्वामी पुलावरून जात असताना, तिघा संशयितांनी त्यास अडविले आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी संशयितांनी त्यांच्याकडील कोयता काढून भास्कर गरडच्या डोक्‍यात, मानेवर, हातावर वार करीत गंभीर जखमी केले. घटनेनंतर संशयितांची पोबारा केला. 
गंभीर जखमी भास्कर गरड यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी रिक्षाचालक असलेला भास्कर गरड हा सध्या बेरोजगार आहे. याप्रकरणी मंगेश महादू धुमाळ (रा. गजानन चौक, कोमठे गल्ली, पंचवटी) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त शांताराम पाटील, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजले, पंचवटीचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी गरडने संशयितांनी कुरापत काढून वार केल्याचे पोलिसांना सांगितले. 
 
Web Title: marath news dangerous attack

टॅग्स