स्वागत लेकीच्या जन्माचे..  एकीचे वैदीक पेशवाई दुसरीचे हत्तीवरुन साखर वाटून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

नाशिक ः काही वर्षापूर्वी गर्भलिंग निदान करुन निर्दयपणे मुलीचे गर्भ पाडण्याच्या कुप्रथा रुजलेल्या समाजात पोटच्या लेकीचे जल्लोषांत थाटामाटात स्वागताची प्रथा रुजते आहे. नाशिक रोडला एकीचे हत्तीवरुन साखर वाटून आणि तर दुसरीचे वैदीक पध्दतीने पेशवाई थाटात स्वागत झाले. दोन वेगवेगळ्या घटनात मुलींच्या जन्माच्या स्वागताला विवाहाप्रमाणे आप्तस्वकिय व परिसरातील नागरिकांनी सहभागी होत आनंद द्विगुणित केला. 

नाशिक ः काही वर्षापूर्वी गर्भलिंग निदान करुन निर्दयपणे मुलीचे गर्भ पाडण्याच्या कुप्रथा रुजलेल्या समाजात पोटच्या लेकीचे जल्लोषांत थाटामाटात स्वागताची प्रथा रुजते आहे. नाशिक रोडला एकीचे हत्तीवरुन साखर वाटून आणि तर दुसरीचे वैदीक पध्दतीने पेशवाई थाटात स्वागत झाले. दोन वेगवेगळ्या घटनात मुलींच्या जन्माच्या स्वागताला विवाहाप्रमाणे आप्तस्वकिय व परिसरातील नागरिकांनी सहभागी होत आनंद द्विगुणित केला. 

नाशिक रोडला तरणतलाव मार्गावर गौरव व भाग्यश्री धर्माधिकारी रहायला आहे. त्यांच्या घरी काल मुलीचा जन्म झाला. जन्माला आलेली मुलगी म्हणजे लक्ष्मीच समजून देशपांडे व धर्माधिकारी मुलीच्या दोन्हीकडच्या आजोळच्या कुटुंबियांनी थाटात स्वागत केले. रस्त्यावर जल्लोषात मिरवणूक काढली. वैदीक पध्दतीने आणि पेशवाई थाटात स्वागत केले. 

हत्तीवरून साखर वाटप 
जेल रोड ः जयभवानी रोड येथे वास्तव्यास असलेल्या विठ्ठल काकड व प्रणाली काकड या दाम्पत्यांनी मुलगी प्रचितीची पहिल्या वाढदिवशी हत्तीवरून सवाद्य मिरवणूक काढत परिसरात साखर वाटप केली. काकड यांच्या कुटुंबात तीन पिढ्यानंतर मुलगी झाली. त्याचबरोबर मुलींना जन्म घेऊ द्या, त्यांना मुक्तपणे शिकू द्या असा सामाजिक संदेश देत समाजप्रबोधन केले .त्यामुळे नाशिकरोड परिसरात काकड कुटूंबियांना अनोख्या पद्धतीने लेक वाचवा ...लेक शिकवा चा जागर केला. 
या कार्यक्रमासाठी रोख 11 हजार रुपये देऊन म्हसरुळहून दोन दिवस आधीच हत्ती मागवला. बॅन्डवालेही बोलावले. सर्वांना निमंत्रणे पाठवली. खुशीला आज परीप्रमाणे सजविण्यात आले होते. महिलांनी नऊ वा-या साड्या, दागिने परिधान केले होते. नांदगाव, निफाड, सिन्नर असे लांबून नातेवाईक आले होते. सायंकाळी राजलक्ष्मी लान्सला पार्टी ठेवली. सर्व जय्यत तयारी झाली. पण पावसाची रिपरिप सुरु झाली. मात्र, तो देवाचा आर्शिवाद समजून या कुटुंबाने भरपावसात हत्तीवरुन मिरवणूक काढली. 

आजींनी धरला भर पावसात ठेका--- 
आजी सुगंधा यांनी खुशीला कडेवर घेऊन सर्वात पुढे नाचत होती. लहान मुलांनी बेटी बचाव, बेटी पढावचे बॅनर्स धरले होते. आजी व नात हत्तीवर विराजमान झाल्यानंतर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल यांचे वडिल सुधाकर हे वीज मंडळात लाईनमन होते. ते मूळचे दारणासांगवी (ता.निफाड) सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचे. पण पत्नी सुगंधाच्या मदतीने त्यांनी मुलांना जिद्दीने उच्च शिक्षण दिले. संस्कार दिले. विठ्ठल काकड हे एमपीएम असून एचडीएफसीमध्ये अधिकारी आहेत. पत्नी प्रणाली एमएससी, डी.फार्म आहे. 

समाजात स्त्रीभृण हत्या ही कीडच आहे. ती समूळ घालविण्यासाठी घरोघरी मुलीचे मुलगी म्हणून नव्हे तर लक्ष्मी घरी आली असे समजून स्वागत व्हायला हवे. याच उद्देशाने 
इतरांनी अनुकरण करावे या भावनेतून हा उपक्रम केला. 
-आचार्य अनिकेत शास्त्री जोशी (मुलीचे मामा) 

Web Title: marath news girl birth swagat