कैलास मानसरोवर यात्रेत अडकलेले  150 यात्रेकरु,रवाना,lतिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

सिमीकोट, ः कैलास मानसरोवर यात्रेहून परताना मुसळधार पाऊस आणि धुक्‍यामुळे इथे पाच दिवसांपासून अडकून पडलेल्या 530 यात्रेकरुंपैकी आज दीडशे यात्रेकरुंना बारा चार्टर विमानाद्वारे नेपाळगंजला रवाना करण्यात आले. त्यात मुंबईच्या 51 आणि नाशिकमधील चौधरी यात्रा कंपनीच्या 6 यात्रेकरुंचा समावेश आहे. या यात्रेदरम्यान, हिलसा-तकलाकेट आणि सिमीकोट या भागात तीन यात्रेकरुंचा मृत्यु झाला आहे. हे तीनही यात्रेकरु दक्षिण भारतातील आहेत. 

सिमीकोटहून 94 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिलसाकडे हेलिकॉप्टरने जाण्यासाठी 18 मिनिटांचा कालावधी लागतो. हिलसा भागामध्ये 500 यात्रेकरु अडकले आहेत. तसेच हिलसापासून चाळीस किलोमीटर अंतरावरील तकलाकोटमधध्ये 300 यात्रेकरु सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. हवामान खराब असल्याने गेल्या पाच दिवसांपासून यात्रेकरुंच्या प्रवासासाठी विमानाची सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज दुपारनंतर हवामानात सुधारणा झाल्यावर तेरा आसनी विमानांनी यात्रेकरुंना सिमीकोटमधून नेण्यास सुरवात झाली. सिमीकोटमध्ये पाच दिवसांपासून यात्रेकरुंसमवेत असलेले चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी ही माहिती "सकाळ'ला दिली. त्यांच्या माहितीनुसार आज रात्री चांगले होते. ही स्थिती कायम राहिल्यास उद्या (ता. 4) विमानसेवा सुरु राहील. 

यात्रेसंबंधीच्या ठळक नोंदी 
 -इंग्लंड, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडामधील 50 अनिवासी भारतीय अडकलेत 
- सिमीकोटमध्ये अडकलेल्या यात्रेकरुंमध्ये महाराष्ट्रातील दीडशे जणांचा समावेश 
 -पुणे, मुंबई, नांदेड, औरंगाबाद, नाशिकभागातील यात्रेकरु सिमीकोटमध्ये सुखरुप 
 -विमानसेवा बंद असल्याने भाजीपाला आणि फळांचा तुटवडा जाणवू लागलाय 
 -हिलसामध्ये वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे यात्रेकरुंचे म्हणणे 
 -हिलसा-तकलाकोट दरम्यान, चीन आणि नेपाळच्या इमीग्रेशनची आवश्‍यकता 
- निवास आणि भोजनाच्या सुविधेला स्थानिक रहिवाश्‍यांच्या सहकार्याची जोड 

""धुके आणि रात्रीच्यावेळी "व्हिजन'ची सुविधा नसलेली विमानसेवा आहे. त्यामुळे भारत सरकारने खराब हवामानात अडकून पडलेल्या भारतीयांच्या प्रवासासाठी सैन्यदलाच्या अत्याधुनिक हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करुन देता येईल काय याचा विचार करणे आवश्‍यक आहे.'' 
- ब्रिजमोहन चौधरी (संचालक, चौधरी यात्रा कंपनी, नाशिक) 

Web Title: marath news man sarovar yatra

फोटो गॅलरी