#MarathaKrantiMorcha नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद, तीन बसेसवर दगडफेक,तासभर रास्तारोको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला नाशिक शहर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उपनगरांमध्ये तीन बसेसवर दगडफेक करतं आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला. सकल मराठा समाजातर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल येथे तासभर रास्तारोको आंदोलन करून आरक्षणाची मागणी करताना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सकल मराठा समाजातर्फे बुधवारी नाशिक जिल्हा बंदची नव्याने हाक देण्यात आली. आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आमदार, खासदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. 
गेल्या चार दिवसांपासून राज्य भरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाच्या आत्मदहनानंतर आंदोलनाची धग वाढली. त्यापार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. नाशिक शहरात बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मेनरोड, शिवाजी रोड, जेलरोड, नाशिकरोड, सातपूर, सिडको भागातील काही दुकाने तुरळक स्वरुपात बंद होती. दुपारनंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होत असल्याची खबर आल्यानंतर दुकाने बंद होण्याचे प्रमाण वाढले. शाळांना सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 
 
महामार्गावर आंदोलन 
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद महामार्गावरील वरदलक्ष्मी लॉन्स येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणास श्रध्दांजली वाहण्यात आली. आरक्षणाच्या मुद्यावर शासन मराठा समाजाला वेठीस धरून दिशाभुल करतं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आता मुक मोर्चा ऐवजी ठोक मोर्चाने सरकारला समज देण्याची वेळ आल्याचे करण गायकर, तुषार जगताप, डॉ. शैलेंद्र गायकवाड, दर्शन पाटील, गणेश जाधव, शाम जाधव, उन्मेष शिंदे यांनी सांगितले. राजु देसले यांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची मागणी केली. यानंतर महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई महामार्गावरील हॉटेल जत्रा चौफुलीवर रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी चार किलोमीटर पायी जावून तासभर आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामार्गावर आंदोलन होण्याची खबर आधीच मिळाल्याने पोलिसांनी वाहतुक अन्य मार्गाने वळविली. 
 

शाळेच्या उपस्थितीवर परिणाम 
या बंदचा परिणाम शाळेच्या उपस्थितीवरही दिसून आला. अनेक शाळांमध्ये पंधरा ते वीस टक्केच उपस्थिती होती तर काही शाळा थेट बंदच होत्या. जी मुले शाळेत आली होती. त्यांना पुन्हा पालक तसेच व्हॅनचालक घेऊन गेले. त्यामुळे शालेय परिसरात आज शांतता होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्यामुळे पालक, विद्यार्थी तसेच विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक व व्हॅनचालक यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती सकाळपासून होती. अनेक पालकांनी मुलांना शाळेत सोडल्यानंतर पुन्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी शाळा गाठली. व्हॅनचालकांनीही शाळेत आणलेली मुले पुन्हा घरी सोडून दिली. दुपारनंतर बस बंद होईल या शक्‍यतेने अनेक विद्यार्थी शाळेतच आले नाहीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आले होते त्यांनीही लगेचच घरी जाणे पसंत केले. 

उद्या जिल्हा बंद 
बैठकीत बुधवारी जिल्हा बंदची हाक देताना सहभागी होणयाचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
 

Web Title: marath news maratha sangtana andolan

टॅग्स