वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या "प्रेफरन्स फॉर्म'ची शुक्रवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या राबविली जाते आहे. ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरुन कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच शाखा, महाविद्यालयांत प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात "प्रेफरन्स फॉर्म' भरायची प्रक्रिया मंगळवार (ता.26)पासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.29) पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवायचे आहे.

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या राबविली जाते आहे. ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरुन कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच शाखा, महाविद्यालयांत प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात "प्रेफरन्स फॉर्म' भरायची प्रक्रिया मंगळवार (ता.26)पासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.29) पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवायचे आहे.

अर्ज भरत असतांना विद्यार्थ्यांना टप्याटप्याने महाविद्यालयांची नावे दिसतील. त्यापैकी किमान एक व कमाल तीनशे पसंतीक्रम विद्यार्थ्यांना नोंदविता येतील. पसंतीक्रमानुसार महाविद्यालय, शाखेची निवड होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी अर्ज काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. त्यामूळे फॉर्म भरण्यापूर्वी त्यासंबंधीच्या सुचना काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्‍यक आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय यांच्या संकेतस्थळावर "प्रेफरन्स फॉर्म' भरण्यासंदर्भातील संकेतस्थळाची लिंक उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने फॉर्म भरता येणार नाही किंवा फॉर्ममध्ये बदलही करता येणार नाहीत. विद्यार्थ्यांना किमान एक तर कमाल तीशने पसंतीक्रम नोंदविता येतील. व्यवस्थितरित्या पसंतीक्रम पाहून घेणे महत्वाचे असेल. "लॉक प्रेफरन्सेस' या पर्यायावर क्‍लिक केल्यावर सदरचे पर्याय सेव्ह होतील. "लॉक प्रेफरन्सेस' करण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अशा उमेदवारांचे प्राधान्यक्रम ग्राह्य धरले जाणार नाहीत. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट मिळवून घ्यावी. दरम्यान फॉर्म भरतांना दर दहा मिनीटांनी इंटरनेटचे सेशन एक्‍सपायर होणार असल्याने पर्याय भरल्यानंतर "सेव्ह प्रेफरन्सेस' हा पर्यायावर क्‍लिक करत रहावे. तसेच अंतीम निवड पूर्ण करण्यापूर्वी पसंतीक्रम व्यवस्थितरित्या बघावा, असे स्पष्ट केले आहे. 

कागदपत्र पडताळणीसाठीची 
दुसऱ्या टप्यातील प्रक्रिया 14 पासून
 
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे. यापूर्वीच कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया झालेली आहे. आता दुसऱ्या टप्यातील कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 14 ते 24 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यापूर्वी कागदपत्र पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ही प्रक्रिया करावी लागणार नाही. पडताळणीसंदर्भातील आसनक्रमनिहाय वेळापत्रक संचनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या टप्यात पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी 18 ते 25 जुलै या कालावधीत मुदत उपलब्ध करून दिली जाईल. 
 

Web Title: marath news medical syallbus

टॅग्स