एम.ई, एम. फार्म, एम.आर्कच्या प्रवेशाला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

नाशिक : गेल्या काही दिवसांत बहुतांश पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. पुढील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलादेखील सुरवात झाली आहे. राज्य सामुहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात अभियांत्रिकीतील एम.ई., औषधनिर्माणशास्त्र शाखेतील एम.फार्म., तर आर्किटेक्‍टचर शाखेतील एम.आर्क.च्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 

नाशिक : गेल्या काही दिवसांत बहुतांश पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. पुढील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलादेखील सुरवात झाली आहे. राज्य सामुहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात अभियांत्रिकीतील एम.ई., औषधनिर्माणशास्त्र शाखेतील एम.फार्म., तर आर्किटेक्‍टचर शाखेतील एम.आर्क.च्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 

      सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीभूत पद्धतीने राबविली जाते आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे. अभियात्रिकीसाठी 18 जुलै, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी 20 जुलै तर आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमासाठी 19 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.पदवी अभ्यासक्रमांप्रमाणेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशदेखील कॅप राऊंडद्वारे केले जाणार आहेत. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान एम.ई. या अभ्यासक्रमासाठी राज्यातील 210 इन्स्टिट्यूटमध्ये 15 हजार 407 जागा उपलब्ध आहेत. 

एम.ई. एम. फार्म एम.आर्क. 
ऑनलाईन अर्ज, कागदपत्र अपलोडची मुदत----------18 जुलैपर्यंत----------20 जुलैपर्यंत------19 जुलै 
कागदपत्र पडताळणी अर्ज निश्‍चितीची मुदत-----------18 जुलैपर्यंत----------20 जुलैपर्यंत------19 जुलै 
प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार---------------------19 जुलै--------------21 जुलै--------20 जुलै 
हरकत नोंदविण्याची मुदत-------------------------20 व 21 जुलै--------22 व 23 जुलै-----21 व 22 जुलै 
अंतीम गुणवत्ता यादी जाहीर होणार---------------------22 जुलै-------------24 जुलै---------23 जुलै 
पहिल्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणे-----------23 ते 25 जुलै--------25 ते 27 जुलै----24 व 25 जुलै 
पहिल्या कॅप राऊंडची निवड यादी जाहीर करणे-------------26 जुलै------------28 जुलै--------26 जुलै 
निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत-------------27 ते 29 जुलै--------29 ते 31 जुलै---27 ते 29 जुलै 
रिक्‍त जागांचा तपशील जाहीर करणार--------------------30 जुलै-------------1 ऑगस्ट-------30 जुलै 
दुसऱ्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणे---------31 जुलै व 1 ऑगस्ट-------2 ते 4 ऑगस्ट---31 जुलै ते 2 ऑगस्ट 
दुसऱ्या कॅप राऊंडसाठी निवड यादी जाहीर करणार----------2 ऑगस्ट------------5 ऑगस्ट------3 ऑगस्ट 
यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत------------------3 ते 5 ऑगस्ट----------6 ते 8 ऑगस्ट----4 ते 6 ऑगस्ट 

Web Title: marath news m.e.m.pharm admision