अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठविणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

इंदिरानगर : हाईक आणि ईन्स्टाग्राम व्दारे अल्पवयीन मुलीला अश्‍लील संदेश पाठवणे,लहान भावाला मारण्याची धमकी देत बाहेर घेऊन जाऩ्याप्रकरणी वडाळा येथील सलमान अकील सय्यद (24) याला इंदिरानगर पोलीसांनी बालकांचे लैंगीक शोषणपासून संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याबाबत पोलीसांनी दीलेल्यामाहीतीनुसार सदर अल्पवयीन मुलगी घरीच राहत असे.मोबाईल व्दारे उपरोक्त ॲप च्या माध्यमातून नकळत ती सलमान च्या संपर्कात आली.त्याचा फायदा घेत त्याने तिला अश्‍लील मेसेज पाठवणे सुरू केले.लहान भावाला मारण्याची धमकी देत बाहेर फीरण्याचे आमीश दाखवून मॉल आदी ठीकाणी नेत तिला लज्जा उत्पन्न होईल असे स्पर्श क

इंदिरानगर : हाईक आणि ईन्स्टाग्राम व्दारे अल्पवयीन मुलीला अश्‍लील संदेश पाठवणे,लहान भावाला मारण्याची धमकी देत बाहेर घेऊन जाऩ्याप्रकरणी वडाळा येथील सलमान अकील सय्यद (24) याला इंदिरानगर पोलीसांनी बालकांचे लैंगीक शोषणपासून संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याबाबत पोलीसांनी दीलेल्यामाहीतीनुसार सदर अल्पवयीन मुलगी घरीच राहत असे.मोबाईल व्दारे उपरोक्त ॲप च्या माध्यमातून नकळत ती सलमान च्या संपर्कात आली.त्याचा फायदा घेत त्याने तिला अश्‍लील मेसेज पाठवणे सुरू केले.लहान भावाला मारण्याची धमकी देत बाहेर फीरण्याचे आमीश दाखवून मॉल आदी ठीकाणी नेत तिला लज्जा उत्पन्न होईल असे स्पर्श करण्याचा प्रयत्न सूरू केल्याने घाबरलेल्या मुलीने पालकांना ही बाब सांगितली.त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला.मात्र तरी देखील सलमानने तिच्या सोशल अकाऊंटला फॉलो करणे सुरू च ठेवल्याने घाबरलेल्या तिच्या पालकांनी पोलीसात तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलीसांनी पोस्को नुसार गुन्हा दाखल करत सलमान ला ताब्यात घेतले आहे. 
 

Web Title: marath news minor girl send message