पर्यावरणदिनी सिन्नर भागात नदी स्वच्छता अभियान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सिन्नर(नाशिक) - सिन्नर नगरपरिषद व दै. सकाळतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नदी स्वच्छता अभियानांतर्गत आज सरस्वती नदीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. या अनोख्या अभियानास सर्वांचाच उत्स्फुर्त सहभाग लाभला. सकाळी भैरवनाथ मंदीर परिसरात नगराध्यक्ष किरण डगळे व सकाळच्या उत्तर महाराष्ट’ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. त्यानंतर खासदार पुल,नाशिक वेस,भाजीमंडई या ठिकाणी सर्वांनी स्वच्छता केली. नगरपरिषदेचे अधिकारी,विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक संघटना आदींनी यात सहभाग नोंदवला.

सिन्नर(नाशिक) - सिन्नर नगरपरिषद व दै. सकाळतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नदी स्वच्छता अभियानांतर्गत आज सरस्वती नदीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. या अनोख्या अभियानास सर्वांचाच उत्स्फुर्त सहभाग लाभला. सकाळी भैरवनाथ मंदीर परिसरात नगराध्यक्ष किरण डगळे व सकाळच्या उत्तर महाराष्ट’ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. त्यानंतर खासदार पुल,नाशिक वेस,भाजीमंडई या ठिकाणी सर्वांनी स्वच्छता केली. नगरपरिषदेचे अधिकारी,विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक संघटना आदींनी यात सहभाग नोंदवला. सर्वांच्या चांगल्या सहभागामुळे परिसर चकाचक दिसायला लागला. दरम्यान आमदार राजाभाऊ वाजे हे स्वतः मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी तसेच नगराध्यक्ष डगळे यांनी या अभियानाचे कौतुक करत जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक,नगरसेवक पंकज मोरे, श्रीकांत जाधव,रूपेश मुठे,नगरसेविका सुजाता तेलंग,ग’ीन रिव्ह्यूलेशन निलेश गावंड,नितीन जाधव,डॉ.विनोद घोलप,डॉ.प’विण सानप आदी उपस्थित होते. 

Web Title: marath news sinner abhiyan

टॅग्स