सरकारच्या पाच टक्के व्हॅटमुळे हज यात्रा महागली

युनूस शेख
शनिवार, 21 जुलै 2018

जुने नाशिक  हज यात्रेवर यंदा सौदी सरकारकडून 5 टक्के व्हॅटची अमंलबजावणी केली आहे. यात्रेकरुना सुमारे 7 हजार 800 रुपये अतिरीक्त मोजावे लागले. शिवाय केंद्र सरकारकडून हज सबसिडी (अनुदान) बंद करत 18 टक्के जीएसटी लावल्याने यंदाची हज यात्रा चांगलीच महागली आहे. 

जुने नाशिक  हज यात्रेवर यंदा सौदी सरकारकडून 5 टक्के व्हॅटची अमंलबजावणी केली आहे. यात्रेकरुना सुमारे 7 हजार 800 रुपये अतिरीक्त मोजावे लागले. शिवाय केंद्र सरकारकडून हज सबसिडी (अनुदान) बंद करत 18 टक्के जीएसटी लावल्याने यंदाची हज यात्रा चांगलीच महागली आहे. 

प्रत्येक मुस्लिम बांधवांचे हज यात्रा करण्याचे स्वप्न असते. असे असताना केंद्र सरकारकडून यात्रेकरुना देण्यात येणारे अनुदान बंद केले होते. इतकेच नव्हे तर जीएसटी करही लावण्यात आला होता. यामुळे हज यात्रा महागली असताना सौदी सरकारने यात्रेवर 5 टक्के वॅटची अंमलबजावणी केल्याने महागाईत आणखी भर पडली आहे. महागाईमुळे मध्यमवर्गीय भाविकांचे यात्रेस जाण्याचे स्वप्न काहीसे धूळीस मिळाले आहे. पूर्वी अजीजीया वर्गातील यात्रेकरुनची 2 लाख 6 हजारांत यात्रा होत असे. अनुदान बंद जीएसटी आणि सौदी सरकारचे 5 टक्के व्याज यामुळे 2 लाख 24 हजारांचा खर्च होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रीन वर्गातील यात्रेकरुना पूर्वी 2 लाख 30 हजार खर्च लागत असे त्यात वाढ होवून 2 लाख 55 हजार मोजावे लागणार असल्याची माहिती हज कमिटीचे जिल्हा प्रशिक्षक जहिर शेख यांनी दिली. 

केंद्रसरकारकडून लागू करण्यात आलेला 18 टक्के जीएसटी कर 5 टक्के करण्यात यावा. अशी मागणी हज कमिटीतर्फे करण्यात आली आहे. मागणी मान्य झाल्यास भाविकाना खर्चातील काहीसी रक्कमेचा परतावा करण्यात येणार असल्याचेही त्यानी सांगीतले. यंदा यात्रेकरुना 45 दिवस हज यात्रेत थांबता येणार आहे. कमिटीतर्फे याचा कुटला अतिरीक्त खर्च घेणार नाही. गेल्या वर्षी 42 दिवसांची यात्रेकरुना व्यवस्था करुन देण्यात आली होती. 

केवळ अफवांचा पेव 
सौदीसरकारने भारतीय चलनातील 2 हजार नोटीस बंदी केली आहे. हज यात्रेकरुन यात्रेस जाताना दोन हजार रुपयांची नोट बरोबर घेवून जावू नये. अशा आशयाचे संदेश काही दिवसांपासून सोशल मिडीयावर प्रसारीत होत आहे. असा कुटला प्रकार नसून सौदी सरकारची 2 हजार नोटेवर कुटलीही बंदी नसल्याचे हज कमिटीने स्पष्ट केले आहे. त्याआशयाचे पत्रही सोमवार (ता.16) रोजी कमिटीने प्रसिद्ध केले असल्याचे कमिटी मार्फत सांगण्यात आले आहे. कुटल्या अफावांवर यात्रेकरुनी विश्‍वास ठेवू नये असे आवाहन कमिटीने केले आहे. 

29 जुलैला पहिली प्लाईट 
हज यात्रेस 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील यात्रेकरुनांचा पहिला जथा 29 जुलैला रवाना होणार आहे. यादिवशी पहिले विमान उडणार आहे. तर 12 ऑगस्टला शेवटचे विमान असणार आहे. 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान यात्रा संपन्न होवून विविध धार्मिक विधी पार पडणार आहे. 22 ऑगस्टनंतर काही भाविक परतीच्या मार्गास लागतील तर काही भाविक पुढील धार्मिक विधीचे संपूर्ण 45 दिवस पूर्ण करतील. 

हज यात्रेवर लावण्यात आलेले कर संबंधीत केंद्र सरकारला पत्र देण्यात आले आहे. कर कमी करण्याची मागणी त्यात केली आहे. 
जहिर शेख ( जिल्हा प्रशिक्षक हज कमिटी) 

Web Title: marath news vat yatra costly