हुकूमशाही बंद करा अन्यथा रस्त्यावर, कर्मचारी संघटनेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नाशिक- महापालिकेतील कामाच्या वाढत्या ताणामुळे घरपट्टी विभागातील सहाय्यक अधिक्षक संजय धारणकर यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याने त्या विरोधात कर्मचारी संघटनांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्याबरोबरचं थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना हुकूमशाही बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ईशारा देण्यात आला. विशेष म्हणजे मुंढें सुध्दा जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असल्याने त्यांच्या समक्षचं हा ईशारा देण्यात आल्याने धारणकर यांच्या मृत्युनंतर कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून आले. 

संजय धारणकर यांनी गुरुवारी गंगापूर रोडवरील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिसांना त्यांच्याकडे चिठ्ठी सापडली त्यात कामाच्या ताणाला कंटाळून आत्महत्या करतं असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह प्रशासनावरचा रोष अधिक वाढला आहे. आज श्रध्दांजली सभेतून संघटनेच्या नेत्यांनी रोष व्यक्त केला.

महापालिका म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी स्वागत कक्षा जवळ श्रध्दांजली सभा बोलाविली होती. याच वेळी क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने आयुक्त तुकाराम मुंढे देखील हजर होते. प्रारंभी मुंढे यांनी जंयतीचा कार्यक्रम आटोपण्याचा सल्ला दिला परंतू तो सल्ला धुडकावरतं प्रथम श्रध्दांजली सभा घेण्यात आली. महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, डॉ. हेमलता पाटील यांच्यासह कर्मचारी आदी उपस्थित होते. 

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा 
म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे म्हणाले, महापालिकेत कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नसल्याने इतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागते, गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण निर्माण केला जात आहे. कामे करण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध नाही परंतू दहशत निर्माण करून काम करून घेतले जात आहे. या दहशतीला आळा बसवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. सततचे निलंबन, बडतर्फीची कारवाई यासारख्या कारवाया करून भिती निर्माण केली जात आहे. त्यामुळेचं कर्मचारी आत्महत्येची पावले उचलतं आहेत.

Web Title: marath news WORKER MEETING