Maratha Kranti Morcha जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद,रास्ता रोको,ठिय्या आंदोलन 

live
live

Maratha Kranti Morcha जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद,रास्ता रोको,ठिय्या आंदोलन 
नाशिकः मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला शहरासह जिल्ह्यीतल प्रमुख भागात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-आग्रा महामार्ग,विंचूर-प्रकाशा महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको करत लक्ष वेधले, चांदवड,सटाणा,मनमाड,येवला,सायखेडा यासारख्या भागात कार्यकर्ते,आंदोलक समूहाने बाहेर पडून आंदोलनात सहभागी झाले. झोडगे येथे बैल 

गाड्याच रस्त्यावर उभे करत वाहतूक बंद पाडली तर पाचोरेवणी,नांदगावला जेलभरो आंदोलनात सहभाग नोंदवला. इगतपुरीत दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते. सुरक्षेचा उपाय म्हणून आज शहर जिल्ह्यातील बसडेपोमधून एकही बस बाहेर पडल्या नाहीत. बसस्थानकात बस उभ्या असल्याने प्रवाशी ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसले. 

नाशिक शहरात डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सकाळ साडेनऊ दहापासून सकल मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. जोरदार घोषणाबाजीने लक्ष वेधले आहे. शहर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवत या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.खबरदारी म्हणून शाळांनी सुट्टी जाहीर केली. बंद नव्हे तर ठिय्या आंदोलन असेच स्वरूप काल सकल मराठा समाजाच्या बैठकीत निश्‍चित केल्याने अत्यावश्‍यक सेवा सुरळीत सुरु आहे. 

नाशिक जिल्ह्यातील आतापर्यतचे महत्वाच्या नोंदी... 
नाशिक-शहर-डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन,सातपूर,नाशिकरोड,सिडको भागात चौकात ठिय्या आंदोलन 
-साकोरा- बैलगाड्या रस्त्यावर लावून आंदोलनात सहभाग 
-नैताळे- ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या 
-वडनेर खाकुर्डी- पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास राऊत यांना निवेदन 
-सटाणा-विंचूर-प्रकाशा राज्य महामार्ग आंदोलनामुळे ठप्प 
-व्यापाऱ्याचा आज स्वयंस्फुर्तीने बंद 
-येवला-विंचूर चौफुलीजवळ धरणे आंदोलन,तरूणांचा मोर्चा 
-अंदरसुल,पोटादा,नगरसुल,धुळगाव आदी 50 हुन गावात बंद 
-सायखेडा परिसता उत्सफुर्त बंद,बाजारसमिती आवारात शुकशुकाट 
-चांदोरी परिसरात बंद,ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन 
-ठेंगोडा- येथे रास्ता रोको,कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग 
-नाशिकः राज्य एसटी कर्मचारी संघटनेचा बंद,एकही बस ठक्कर बाजार स्थानकातून बाहेर पडली नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com