#MarathaKrantiMorcha अमळनेरला मराठा बांधवांचे मुंडन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

अमळनेर : काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून आरक्षणाबाबत राज्यशासनाच्या निषेधार्थ मराठा समाजबाधवांनी आज सामुहिक मुंडन केले. त्यानंतर शहरात रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. 

अमळनेर : काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून आरक्षणाबाबत राज्यशासनाच्या निषेधार्थ मराठा समाजबाधवांनी आज सामुहिक मुंडन केले. त्यानंतर शहरात रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महारजांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठा बांधवांनी मुंडन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील, सचिन पाटील, श्‍याम पाटील, संभाजी ब्रिगेडचे अनंत निकम आदींनी मुंडन केले आहे. त्यानंतर रॅली काढण्यात आली. यावेळी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. आठवडे बाजार, गंगाघाट, पन्नालाल चौकमार्गे शासकीय विश्रामगृहात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत माजी आमदार साहेबराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ऍड. ललिता पाटील, सुरेखा पाटील, जयवंत शिसोदे, संभाजी ब्रिगेडचे संदेश पाटील, श्रीकांत चिखलोदकर, दीपक काटे, विशाल भोसले, सुरेश पाटील, अनिल अंबर पाटील, शत्रुघ्न पाटील, महेश पाटील, संदीप घोरपडे, जयेश काटे आदी सहभागी झाले होते. त्यानंतर विश्रामगृहात काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: maratha kranti morcha amalner mundan