Maratha Kranti Morcha: मराठा आंदोलन आयोजकांविरोधात गुन्हे दाखल; चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नाशिक : मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे आणि त्यानंतर आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून शहरभरातून मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांसह सुमारे 200 जणांविरोधात सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक : मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनांप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे आणि त्यानंतर आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश झुगारून शहरभरातून मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांसह सुमारे 200 जणांविरोधात सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 9) सकल मराठा समाजातर्फे गंगापूर नाका येथे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, दुपारी एक-सव्वा वाजेच्या सुमारास अचानक आंदोलनात सहभागी काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेत, शहरातून मोर्चा काढला. यात काही तरुणांनी ज्या रस्त्यावरूनमोर्चा काढल्या त्या मार्गावरील दुकानांवर दगडफेक केली. काही ठिकाणी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात आज आंदोलनाचे आयोजक माजी महापौर प्रकाश मते, चंद्रकांत बनकर, अजय उर्फ मयुर निंबाळकर, कपिल शिंदे यांच्यासह 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, मोर्चातील तरुणाईला फुस लावणे, जमावबंदीचा आदेश झुगारून मोर्चा काढणे, दगडफेक करून गंगापूर रोडवरील डोंगरेवस्तीगृहात चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या, तसेच दहशत माजविणे याप्रकरणी संशयित संदीप परशराम फुगट (रा. रामवाडी, पंचवटी), मोहीत प्रभाकर पवार (रा. मु.पो. सौंदाणे, मालेगाव), गणेश बाळासाहेब झिंझुरकर (रा. माळीगल्ली, शनि चौक, सातपूर), शैलेश प्रदीप शिंदगे (रा. अशोकनगर, सातपूर) या चौघांना अटक करण्यात आली असून सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये एमएच 15 पीपी 9909, एमएच 15 इइ 1100, एमएच 15 सीटी 3515, एमएच 15/5454 या चार चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम राठोड हे करीत आहेत.

छायाचित्रणानुसार होणार धरपकड
आंदोलकांनी शहरभर काढण्यात आलेल्या मोर्चाचे छायाचित्रण पोलिसांनी केले असून त्यामध्ये धुडगूस घालणारे, दगडफेक करणारे तसेच, उघड्या दुकानांना बंद करण्यासाठी दहशत माजविणाऱ्यांचा शोध त्यावरून घेतला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha four arrested at nashik