Maratha Kranti Morcha : जळगाव विभागातून तीन हजार फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने काल ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरासह राज्यभरात आंदोलन झाले. आंदोलनाकांतर्फे ‘रास्ता रोको’ होत असून, या आंदोलनात बसची तोडफोड होण्याची शक्‍यता लक्षात घेता अनुचित घटना रोखण्यासाठी काल बससेवा बंद ठेवण्यात आली. जळगाव विभागांतर्गत जवळपास तीन हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजातील आंदोलनात ‘एसटी’ला लक्ष करण्यात आले आहे. महामंडळाच्या बसची तोडफोड आणि जाळण्याचे प्रकार देखील झाले आहेत. यामुळे महामंडळाला मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता आजच्या ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासून सायंकाळी सहापर्यंत बस आगाराबाहेर न काढण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे ‘एसटी’वर हल्ला केल्यास चालक-वाहकांनी त्याचे चित्रीकरण करण्याचे आदेश देखील आहेत. यानुसार जळगाव विभागांतर्गत येणाऱ्या आगारात बस लावण्यात आल्या होत्या. 

दिवसभरात केवळ १३९ फेऱ्या
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जीवनदायिनी असलेली ‘लालपरी’ची चाके काल संपामुळे थांबली होती. दिवसभरात एकाही आगारातून फेरी सोडण्यात आली नाही. सर्व पंधरा आगारातील गाड्या डेपोमध्ये जमा असल्याने विभागातून सकाळच्यावेळी केवळ १३९ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. यानंतर सायंकाळपर्यंत एकही फेरी सोडण्यात आली नव्हती.

कोटीची उलाढाल ठप्प
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागांतर्गत येणाऱ्या पंधरा आगारांमधून दिवसभरात ग्रामीण आणि लांबपल्ल्याच्या मिळून साधारण तीन हजार फेऱ्या होत असतात. यापैकी केवळ १३९ फेऱ्याच झाल्या आहेत. म्हणजेच जळगाव विभागातून २ हजार ९०० फेऱ्या रद्द झाल्याने विभागाला दिवसभरातून ८० ते ८५ लाखांचे मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. मात्र बसस्थानकाबाहेर एकही बस सोडण्यात आली नसल्याने तोडफोडीतून एसटीचे नुकसान झाले नसल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले यांनी सांगितले.

Web Title: Maratha Kranti Morcha Jalgaon division canceled three thousand st bus