गावितांकडून "ऍट्रॉसिटी'चा गैरवापराचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

धुळे - आरक्षणप्रश्‍नी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात 16 व्या दिवशी रविवारी अतिउत्साही आंदोलकांकडून भाजपच्या संसदरत्न खासदार डॉ. हीना गावित यांच्या कारची तोडफोड झाली. त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली.

मात्र त्यांच्याकडून ठार मारण्यासंबंधी खोटा गुन्हा दाखल होतानाच "ऍट्रॉसिटी'चाही गैरवापर झाला. या प्रकाराचा निषेध, धिक्कार करत असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत मांडली. क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे म्हणाले, की आरक्षणाचा लाभ घेत आणि ऐश्‍वर्यसंपन्न कुटुंबातील गावित परिवाराने मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी मिळविली. आजोबांपासून आई- वडिलांपर्यंत आणि स्वतःही खासदार गावित यांनी राजकीय लाभ मिळविला. मात्र शिक्षण, नोकरीसाठी आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाचा लढा त्यांना समजू नये, याचे वैषम्य वाटते. औरंगाबादला खासदार चंद्रकांत खैरे यांनी आंदोलकांचा रोष पत्करूनही आंदोलनाच्या भावना जाणून घेत शिंदे परिवाराला मदत केली. हा आदर्श समोर ठेवून त्यांनी वादावर पडदा टाकण्याची गरज होती.

Web Title: Maratha Reservation Dr. Heena Gavit Atrocity The allegation of misuse