#MarathaKrantiMorcha देवभाने फाट्यावर रास्ता रोको

जगन्नाथ पाटील
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने (ता.धुळे) फाट्यावर अाज (ता.25) सकाळी साडेदहाला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात घोषणा देत, आरक्षण देत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी भाषणातून संताप व्यक्त केला. कापडणे येथे घंटानाद आंदोलन झाले. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अकरा वाजेनंतर शाळा वगळून बंद पाळण्यात आला. या आंदोलनात सर्वपक्षीय युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कापडणे (ता.धुळे) : मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने (ता.धुळे) फाट्यावर अाज (ता.25) सकाळी साडेदहाला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात घोषणा देत, आरक्षण देत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी भाषणातून संताप व्यक्त केला. कापडणे येथे घंटानाद आंदोलन झाले. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अकरा वाजेनंतर शाळा वगळून बंद पाळण्यात आला. या आंदोलनात सर्वपक्षीय युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कापडणेत दहाला घंटानाद, श्रध्दांजली
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ  सकाळी साडेदहाला घंटानाद अांदोलन झाले. यावेळी  मराठा अारक्षणासाठी जीव गमावणार्‍या काकासाहेब शिंदे यांना अादरांजली वाहण्यात आली. यावेळी  मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सरपंच भटू पाटील, मनोज पाटील, भय्या बोरसे, अरुण पुंडलिक पाटील, अरविंद पाटील, भागवत पाटील, चंदु पाटील, प्रमोद पाटील, विक्की पाटील, योगेश पाटील, संजय युवराज पाटील,  विश्वासराव देसले,  मनोज पाटील, भुषण पाटील, शाम पाटील, ललित पाटील, नाना पाटील, माजी सरपंच मधुकर पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे रामदास वाघ, राजेन्द्र माळी, धानेश्वर पाटील, हेमंत पाटील, मनोज पाटील, बंडू पाटील, धनंजय पाटील, दीपक पाटील, राकेश पाटील आदी सहभागी झाले होते.

देवभाने  फाट्यावर  रास्ता रोको
कापडणे, देवभाने, नगाव, धनूर येथील ग्रामस्थांनी देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. सोनगीर पोलिस ठाण्याच्या  कर्मचार्‍यांनी चोख बंदोस्त ठेवला होता. दरम्यान, कापडणे येथे  बंदचे आवाहन करण्यात आले. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: MarathaKrantiMorcha road close at devbhane phata