#MarathaKrantiMorcha गुरुवारी येवला बंदची हाक, बाजार समितीचे व्यवहारही बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

येवला - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उद्या गुरुवारी सकल मराठा समाजाच्या शहर बंदची हाक दिली आहे.उद्या बंदमध्ये बाजार समितीही सहभागी होणार असून कुठलेही व्यवहार होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.दरम्यान पाटोदा येथे मंगळवारी तर अंदरसुल येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

गुरुवारी सकाळी ९ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने बंदच्या पार्श्वभूमीवर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.आज शहरातील टिळक मैदानावर समाजाच्या वतीने आंदोलनात मृत पावलेल्या काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे यांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नरेशकुमार बहिरम ,पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.बाजार समितीपासून निघालेली रॅली विंचूर चौफुलीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहरात मेन रोडमार्गे नेण्यात येऊन टिळक मैदानावर विसर्जित करण्यात येणार आहे.याठिकाणी आंदोलनात बलिदान दिलेल्या शिंदे व सोनवणे या दोघांना श्रध्दांजली अर्पण केली जाणार आहे.
अंदरसुलमध्ये कडकडीत बंद

Web Title: #MarathaKrantiMorcha yeola band on Thursday