esakal | एकाच ठिकाणी आढळली ११५ सापाची पिले

बोलून बातमी शोधा

snake
एकाच ठिकाणी आढळली ११५ सापाची पिले
sakal_logo
By
टिम इ सकाळ

तऱ्हाडी (धुळे) : अर्थे बु. (ता. शिरपूर) येथे दिवसभरात एकाच ठिकाणी एकच जातीचे ११५ सापाची पिले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर सापाच्या पिल्लांना सर्पमित्र दिनेश बोरसे व रोहित माळी यांनी बाहेर काढून नांदरडे जवळील जंगलात थंड पाण्याच्या जागी सोडून जीवदान दिले.

अर्थे येथील गिरीश माधवराव पाटील व नारायण तानका सनेर यांच्या घराच्या ओट्याखाली गटारीच्या कोपऱ्याला एकाच दगडाखाली एकच जातीचे ८५ सापाची पिले आढळून आले. यामुळे नागरिक भयभीत झाले. त्यानंतर गावातील जयेश सोनार यांनी लागलीच वाघाडी येथील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.

एका दगडाखाली ७० पिले

संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोरसे व त्याचे सहकारी सर्पमित्र रोहित माळी हे तात्काळ अर्थे येथे येत एकाच दगडाखाली एकाच जातीचे ७० सर्पाचे पिले आढळून आल्याने बाहेर काढली. तसेच आजूबाजूच्या दोन भिंतीमधून १५ पिले सर्पमित्र दिनेश बोरसे व त्याचे सहकारी सर्पमित्र रोहित माळी अथक परिश्रम करून सुरक्षित बाहेर काढली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घटनास्थळावरून पिले बाहेर निघत असल्याचे फोन सर्पमित्राना आल्याने परत सायंकाळी त्याच ठिकाणाहुन ३० पिले बाहेर काढले. दिवसभरात जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे व रोहित माळी यांनी अर्थे गावातून एकाच ठिकाणाहून ११५ पिलांना जंगलात थंड पाण्याचा जागेवर सोडून जीवदान दिले.

मादी देते एकावेळेस अंडी

सापडलेली सर्व पिले पाणदिवड जातीच्या सापाची आहेत. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून या सापाची लांबी ५ फूटपर्यंत असते. त्यात मादी ही ५ फुटापर्यंत वाढते आणि नर हा ३ फुटापर्यंत वाढतो. या सापाची मादी एकावेळेस ९० ते ११६ अंडी देऊ शकत असल्याची माहिती जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांनी दिली.