केळी उत्पादकाची व्यापाऱ्याकडून फसवणूक

केळी उत्पादकाची व्यापाऱ्याकडून फसवणूक
banana farmer
banana farmerbanana farmer

भटाणे (धुळे) : तऱ्हाडी (ता. शिरपूर) येथील शेतकरी संजय वामन जाधव (Farmer) यांचे वार्षिक केळी पीक (Banana) पन्नास हजार नगद देऊन उर्वरित रकमेचा खोट्या स्वाक्षरीचा धनादेश देऊन फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी शेतकरी जाधव यांनी व्यापाऱ्याने फसवणूक केल्याची तक्रार शिरपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. (Banana grower cheated by trader)

येथील शेतकरी संजय जाधव यांनी आपल्या चार एकर शेतात गेल्या वर्षी केळी पिकाची लागवड केली होती. पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना चोपडा, जि. जळगाव येथील व्यापारी मुक्तार शेख हामिद खाटिक (रा. मल्हारपुरा, भवानी मंदिराजवळ, चोपडा) यांना २५ ऑक्टोबर २०२० ला संपूर्ण वर्षाचे पीक काढणी ठोक पद्धतीने चार लख अकरा हजार या दराने ठरले. रोख पाच हजार उचल म्हणून देऊन लेखी करून घेतले. सदर व्यापाऱ्याने २७ ऑक्टोबर२०२० पासून पीक काढणीला सुरवात केली. त्या बदल्यात संबंधित व्यापाऱ्याने ५ फेब्रुवारी २०२१ तारखेचा धनादेश दिला. धनादेश दिल्यानंतर शेतकरी धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केला असता Drawers Signature differs असा शेरा मारून चेक परत आला. संबंधित व्यापाऱ्याने बँकेत इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली होती, तर धनादेशावर मराठीत स्वाक्षरी केल्याने धनादेश बाद झाला.

banana farmer
मुलीला अश्‍लिल हावभाव; जामनेरात तणाव, दगडफेकीत एकजण जखमी

शेतीवरच सारे अवलंबून

श्री. जाधव सामान्य शेतकरी असून, त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पीककर्ज व ट्रॅक्टर कर्ज घेतले आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. वेळेवर पैसे न मिळाल्यास आत्महत्येची वेळ येणार नाही याची आपण दक्षता घेऊन सहकार्य करावे, असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले असून, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्याच्या फसवणुकीची ही दुसरी तक्रार असून, गेल्या वर्षी भटाणे येथील शेतकरी जितेंद्र कथ्थू भोई यांचा मका मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याला दिला होता. त्यांनी पानसमेल येथे तक्रार केल्यानंतर त्यांचे पैसे परत मिळाले होते. तक्रारीची नोंद केल्यावरच फसवणूक केल्याचे कळते. मात्र बरेच शेतकरी तक्रार करत नाहीत. त्यामुळे अजूनही परिसरातील शिरपूर, शहादा, शिंदखेडा तालुक्यांतील गहू, मका, केळी पिकांच्या पैशांसाठी शेतकरी व्यापाऱ्याकडे चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

मी सामान्य शेतकरी असून, शेतीवरच उदरनिर्वाह होत असून, मला खोटा धनादेश देऊन फसवणूक केली. माझा झालेला अपघातही याच कारणाने झाला आहे.

-संजय जाधव, फसवणूक झालेला शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com