संपादित जमिनीला बाजारभावाप्रमाणे मोबदल्‍याची मागणी

strike
strike

धुळे : सुलवाडे- जामफळ- कान्होली उसपासिंचन योजनेसाठी संपादित झालेल्या व होणाऱ्या शेतजमिनींना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, शेतजमिनींवरील पिकांची भरपाई द्यावी, अन्यथा १९ मार्चपासून योजनेवरील मौजे सोंडले (ता. शिंदखेडा) येथील काम बंद पाडू, असा इशारा भारतीय किसान संघाने दिला आहे. 
या उसपासिंचन योजनेसाठी सोनगीर, सोंडले येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्या आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही जमिनींना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळालेला नाही. उलट, योजनेचे काम जोरात सुरू आहे. ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे शेतजमिनींची संपूर्ण नुकसानभरपाईची रक्कम अदा करावी. भरपाईची रक्कम अदा करताना शेतजमिनीवरील पिकांचीही भरपाई द्यावी. 

काम बंद पाडण्याचा इशारा
मोबदला रक्कम जोपर्यंत अदा होत नाही तोपर्यंत सुलवाडे- कान्होली उसपासिंचन योजनेचे कामकाज बंद ठेवा, अन्यथा आम्ही सोंडले येथील योजनेचे काम बंद पाडू व त्या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला. आंदोलनात संघटनेचे घनश्याम गुजर, श्‍याम माळी, संजय माळी, गौतम बैसाणे, पराग देशमुख, आर. के. माळी आदींसह उसपासिंचन संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी सहभागी झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com