आरटीओतून लायसन देणे केले बंद

नवीन वाहनांची नोंदणी, लायसन मिळू शकणार नाही.
driving licence
driving licencedriving licence

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १ मेपर्यंत लॉकडाउन घोषित केले आहे. त्यानुसार येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात शासन निर्देशाप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज चालेल. यात अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांची नोंदणी, नूतनीकरण, प्रलंबित कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. नवीन वाहनांची नोंदणी, लायसन मिळू शकणार नाही.

नवीन वाहन नोंदणी- अत्यावश्यक सेवेतील वाहने, सारथी ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने मंजूर केले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील. वाहनविषयक कामे, वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद घेणे किंवा कमी करणे, ४.० प्रणालीवर प्राप्त व नियमांची पूर्तता करणारी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण केली जातील. नव्याने कामकाजासंदर्भात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण- अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही. परवानाविषयक कामकाज, ४.० प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणारे सर्व परवानाविषयक कामकाज सुरू राहील. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती- कामकाज बंद राहील.

अनुज्ञप्तीविषयक इतर कामे- दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे, नूतनीकरण आदी सारथी ४.० प्रणालीवर प्राप्त व पूर्तता करत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण केली जातील. नव्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

निगेटीव्ह अहवाल बंधनकारक

सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खासगी प्रवासी बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही शासनाने लागू केलेलया ‘ब्रेक द चेन’अंतर्गत तरतुदीनुसार होईल. अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असून, अन्य कामकाजासाठी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना सकाळी दहा ते दुपारी दोन, या वेळेमध्ये ॲन्टिजेन चाचणी करून (४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर) निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असेल. कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होईल. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्तीसाठी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या सर्व अर्जदारांच्या अपॉइंटमेंट पुढील घोषित तारखांना नियोजित असतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले.

तपासणीचे कामकाज सुरूच

‘आरटीओ’ कार्यालयाकडून अंमलबजावणीविषयक कामकाज सुरूच राहणार असून, अंमलबजावणी पथकाकडून रस्ता सुरक्षेशी निगडित वाहनांची तपासणी करण्यात येईल. वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्राधान्याने करण्यात येईल. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमितपणे सुरू राहील, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com