लग्‍नसमारंभारत ५० लोकांची परवानगी क्रूरचेष्टा; बुकिंग रद्द होत असल्‍याने मंगल कार्यालय, लॉन्सचालकांचे साकडे 

dhule corporation
dhule corporation

धुळे : मंगल कार्यालय व लॉन्सचालकांना लग्नसमारंभासाठी केवळ ५० लोकांची परवानगी देणे ही क्रूरचेष्टा आहे, असे म्हणत या निर्णयामुळे मंगल कार्यालय, लॉन्सचालकांचा या वर्षाचा सीझनही वाया जाईल. त्यामुळे कमीत कमी ३०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी द्यावी, अशी मागणी मंगल कार्यालय व लॉन्सचालकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 
लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालयात येऊनही केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल तर ज्यांच्याकडे कार्य आहे ते मंगल कार्यालयात कशाला येतील? ते आपल्या घरीच किंवा जवळच्या मोकळ्या जागेत समारंभ उरकतील. प्रत्येक मंगल कार्यालय चालकाकडे किमान शंभर कर्मचारी आहेत. या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे या व्यवसायाला फटका बसला आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद, दुसरीकडे मात्र महापालिकेसह इतर संस्थांकडून कर आकारणी सुरू आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न आहे. 

कमीत कमी तिनशेची परवानगी हवी
सध्या निम्म्या उपस्थिती क्षमतेने व शासकीय नियमाप्रमाणे कार्यक्रम पार पाडले जात आहेत. मात्र, अचानक नियमात बदल झाल्याने बुकिंग रद्द होत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता १५ मार्चपर्यंत जुन्या नियमाप्रमाणे किंवा कमीत कमी तीनशे लोकांना उपस्थितीची परवानगी द्यावी. आम्ही शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू, असे मंगल कार्यालयचालकांनी म्हटले आहे. मागणीचे निवेदन साईबाबा, केशरानंदन, शिवसागर, आशीर्वाद, लक्ष्मीनारायण, शुभलक्ष्मी लॉन्स, कान्हार एजन्सी, हिरे भवन, रचना हॉल, आनंद लॉन्स, अजय लॉन्स, दाते रिजेन्सी, कृष्णा रिसॉर्ट, वेदांत मंगल कार्यालय संचालकांनी दिले. 
 
निमंत्रकांकडून दंड घ्या 
सध्या महापालिकेचे भरारी पथक क्षमतेपेक्षा जास्त लोक आढळले तर लॉन्समालकाला दंड आकारत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे लग्न आहे, तेच ऐनवेळी जास्त लोकांना बोलवितात. त्यामुळे लॉन्स, मंगल कार्यालय चालकांऐवजी समारंभ निमंत्रकांकडून दंड वसूल करावा, अशी मागणीही मंगल कार्यालयचालकांनी आयुक्त शेख यांच्याकडे केली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com