धुळ्यात पंधरा दिवस प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

corona
corona

धुळे : आगामी काळातील विविध आंदोलने, सण, उत्सव व कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धुळे जिल्ह्यात ३ मार्च ते १७ मार्चदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. 

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू, साधने बरोबर ठेवणे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे, हावभाव, जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सभा घेणे, मिरवणूक काढणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चा, मिटिंग, कार्यक्रम, रॅली इत्यादींबाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य निर्णय घेऊन परवानगी द्यावी. अशी परवानगी तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास हे निर्बंध लागू होणार नाहीत. हा प्रतिबंधात्मक आदेश ३ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते १७ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत (११ः५५) पर्यंत लागू राहील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com