धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता थांबेना; तिघांचा मृत्यू

corona
corona

धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबायला तयार नाही अशी स्थिती आहे. आज (ता.२३) धुळे शहरातील तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जिल्हाभरातून नव्याने तब्बल ५५० कोरोनाबाधित आढळुन आले. सोमवारी (ता.२२) देखील तब्बल ५०२ बाधित आढळून आले होते. त्यामुळे फक्त दोनच दिवसात हजारावर बाधितांची भर पडली. दुसरीकडे धुळे शहरात बाजारातील गर्दी कमी व्हायलादेखील तयार नाही. त्यामुळे यंत्रणेपुढे प्रश्‍नांची मालिकाच उभी आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांबरोबरच कोरोनाबळींची संख्याही गेल्या काही दिवसात वाढल्याचे चित्र आहे. आज (ता.२३) ही तीन कोरोनाबाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीनही मृत्यू धुळे शहरातील आहेत. यात राजवाडे नगर (चाळीसगाव रोड) येथील ७० वर्षीय पुरुष, कुमार नगर येथील ६५ वर्षीय पुरुष तर देवपूर भागातील ४४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या तीन मृत्यूंबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींचा आकडा ४०५ वर पोहोचला. यात धुळे महापालिका क्षेत्रातील १८३ तर उर्वरीत जिल्ह्यातील २२२ मृतांचा समावेश आहे. 
 
दोन दिवसात १०५२ 
सोमवारी (ता.२२) ५०२ व आज (ता.२३) ५५० अशा दोनच दिवसात जिल्ह्यात तब्बल १०५२ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडाही झपाट्याने २२ हजार ४३० वर जाऊन पोहोचला. एकिकडे कोरोनाबाधित व कोरोनाबळींचा आकडा वाढत असतांना नागरिक दक्षता घेण्यात कमी पडत असल्याचे पाहायला मिळते. धुळे शहरात मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱया आग्रारोड, पाचकंदील भागात दररोज गर्दी उसळलेली असते. एकिकडे प्रशासनाने फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी विविध समारंभांना उपस्थितीच्या मर्यादा घातलेल्या आहेत. दुसरीकडे मात्र बाजारात गर्दीचा उच्चांक गाठला जात आहे. त्यामुळे या स्थितीवर आता नियंत्रण कसे मिळवायचे असा प्रश्‍न प्रशासनसमोरही उभा राहिल्याचे दिसते.  

जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे
जिल्हा रुग्णालय धुळे (२१६ पैकी १०५), प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका- नगाव, बोरीस, नेर (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ३७ पैकी १२), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (२१२ पैकी ६७), प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर तालुका- बोराडी, विखरण, सांगवी, होळनांथे, रोहिणी, वकवाड, खर्दे (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे २१३ पैकी २६), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (२८ पैकी १३), प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेडा तालुका- मालपूर, चिमठाणे, धमाणे (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ९३ पैकी १६), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (१५१ पैकी ७६), साक्री तालुका (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे २२९ पैकी ४८), धुळे महापालिका युपीएचसी (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ७११ पैकी ०८), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (४५ पैकी २१), एसीपीएम लॅब (२० पैकी १६), खासगी लॅब (२१७ पैकी १४२). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com