आगळावेगळा छंद..चार महिन्यांत तीनशे ‘स्केचेस’
माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत इंग्रजी शिक्षक असून, त्यांना चित्र रेखाटनाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक थोर महापुरुषांचे चित्र रेखाटले आहेत.
सोनगीर (धुळे) : वर्शी (ता. शिंदखेडा) येथील यशवंत निकवाडे यांनी विविध विषयांवर चार महिन्यांत तीनशे स्केच चित्रे काढले असून, त्या माध्यमातून थोरांना अभिवादन करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ हौस म्हणून रेखाटनाचा छंद जोपासला असून, त्यांनी चित्रकलेचे कुठलेही शिक्षण घेतलेले नाही.
हेपण वाचा- सोशल मिडियावरची रेशीमगाठ; भुसावळ ते मुंबई व्हाया जम्मू- काश्मीर
श्री. निकवाडे हे वर्शी येथील माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत इंग्रजी शिक्षक असून, त्यांना चित्र रेखाटनाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक थोर महापुरुषांचे चित्र रेखाटले आहेत. बहुधा सर्वच संत, महात्मा, महापुरुष, समाजसेवक, नेते, अभिनेते यांचे स्केचेस त्यांनी काढले आहेत. महापुरुषांची जयंती वा पुण्यतिथीला स्केचेस काढून ते शुभेच्छा किंवा अभिवादन करतात.
धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
पुस्तक प्रकाशित अन् चाळीस पुरस्कार
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाचे परिसरात कौतुक होत आहे. त्यांचे यशरंग, जगण्याची संजीवनी, हास्यकल्लोळ, आता इंग्रजी बोला, बोटांवरून ओठांवर अशी चार पुस्तके प्रकाशित झालेली असून, आतापर्यंत ४० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे