‘मेलफिमेल’ची निर्मिती लॉकडाउनच्या काळात; लघुपटाची फिल्‍म फेस्‍टिव्हलमध्ये

mailfimel short film
mailfimel short film

धुळे : येथील भूषण संजय पाटील याच्या ‘मेलफिमेल’ या लघुपटाची (शॉर्टफिल्म) लॉस एंजिल्स (अमेरिका) येथे होणाऱ्या लिफ्ट औफ ग्लोबल नेटवर्क फिल्म इंटरनॅशनल फेस्टिव्हल आणि टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. खानदेशच्या सुपुत्राच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे कौतुक होत आहे. 
भूषण पाटील सध्या दिल्ली येथे एनएसडीमध्ये शिकत आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमुळे तो आपल्या घरी धुळ्यात आला. येथे त्याने ‘मेलफिमेल' या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन केले. या लघुपटाची लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या महोत्सवात सादरीकरणासाठी निवड झाली आहे. ‘मेलफिमेल’ लघुपटाचे लेखक, दिग्दर्शन, निर्मिती भूषण पाटील याने, तर तेजस महाजन, करिश्मा देसले यांनी भूमिका साकारली आहे. फोटोग्राफी, चित्रिकरण, लाइट- पंकज टिकुन, कला दिग्दर्शन- शरद जाधव, वेशभूषा- अनिल प्रधान, साउंड डिझायनिंग- ध्रुव महाजन यांनी केले आहे. चंद्रशेखर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

भूषणचा प्रवास 
भूषण पाटीलने ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तसेच ‘पोट्रेट’, ‘देवदासी’, ‘परतीच्या वाटेवर’ या एकांकिकामध्येही भूमिका केली आहे.‘टिंब टिंब', ‘दोनच रंग' या एकांकिका व ‘काया’ या नाटकाचे लेखनही त्याने केले आहे. ‘राणी माशी’ या एकांकिकेमध्ये प्रकाशयोजना सांभाळून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे‌. ‘तस्करी’ नाट्यलेखन व दिग्दर्शन, ‘दुल्हन ठागीया’चे लेखन व दिग्दर्शन, ‘पोस्टर इन्कलाब’चे लेखन, ‘बोन्साय' व ‘अंन्टीजन’चे दिग्दर्शन,‘कर्णगाथा’मध्ये अभिनेत्याची भूमिका, ‘हिरराजा', ‘औरंगजेब'मध्ये भूमिका,‘दोनच रंग'चे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ‘येथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात संगीत देऊन राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळविले आहे. 

प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते सत्कार 
भूषणच्या ‘मेलफिमेल’ या लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात झालेली निवड व एकूणच कला क्षेत्रातील त्याच्या यशाबद्दल त्याचा येथे प्रसिद्ध नाट्यलेखक, विचारवंत प्रा. अनिल सोनार यांच्या हस्ते सत्कार झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. साने गुरुजी स्मारकचे गोपाळ नेवे, नाझनीन शेख, छाया सोमवंशी, सुवर्णा लाड, सुषमा महाले, महेंद्र शिरसाट, जगदीश चव्हाण, राजन शिरसाठ, सचिन वाघ, घनश्याम पाटील आदी उपस्थित होते. शिरसाट यांनी आभार मानले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com