सचिन वाझे वापरत मर्सडीज धुळ्यातून विक्री; ऑनलाईन पोर्टलवरून झाली विक्री

Sachin Waze
Sachin Waze

धुळे : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सचिन वाझे प्रकरणात तपास करत असताना मंगळवारी सायंकाळी मर्सडीज कार जप्त केली. ही कार धुळे पासिंगची असून ती धुळ्यातूनच विकण्यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. याबाबत कार मालकानेच खुलासा केला आहे.

मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलेल्या वाहनांमध्ये मर्सडीज कार दिसून येते. हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणाचा तपास करणारी एनआयए या कारच्या शोधात होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ‘एनआयए’ने सदरची कार मंगळवारी सायंकाळी मुंबईमध्ये एका ठिकाणी पार्किंग केली असताना जप्त केली. तिचा क्रमांक एमएच १८ बीआर ९०९५ असा आहे. यामुळे ही कार धुळ्यातील असल्‍यासचे स्‍पष्‍ट झाले आहे.

ऑनलाईन पोर्टलवरून विक्री
धुळ्यातील रहिवासी असलेले मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर मर्सडीज कार होती. ती कार त्‍यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी विकत घेतली होती. दरम्‍यान गेल्‍या महिन्यात म्‍हटजेच फेब्रुवारीमध्ये मर्सडीज विक्रीसाठी काढली होती. याकरीता ऑनलाइन पोर्टलवर फोटा टाकून विक्रीसाठी काढलेली कार पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com