esakal | राष्ट्रवादी काँग्रेसने उभारला सेल्‍फी पॉइंट; ‘आय लव्हू धुळे`ने वेधले लक्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

selfie point

धुळे शहरात सौंदर्यीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांनी आपल्या संकल्पनेतील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खर्चाने शहरात प्रमुख चार ठिकाणी एक्रेलीक वर्डचे सेल्फी पॉइंट उभारण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने उभारला सेल्‍फी पॉइंट; ‘आय लव्हू धुळे`ने वेधले लक्ष 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेतर्फे शहरात चार ठिकाणी एक्रेलीक वर्डच्या माध्यमातून सेल्फी पॉइंट उभारण्यात येत आहेत. यातील एका सेल्फी पॉइंटचे शहरातील लहान पुलाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ मंगळवारी (ता. २) उद्घाटन झाले. 

धुळे शहरात सौंदर्यीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांनी आपल्या संकल्पनेतील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खर्चाने शहरात प्रमुख चार ठिकाणी एक्रेलीक वर्डचे सेल्फी पॉइंट उभारण्यात येत आहेत. इंग्रजीत आकर्षक पद्‌धतीने तयार केलेल्या ऐक्रेलीक साहित्यातून आय लव्ह यू धुळे, आय लव्ह यू भारत, माझे धुळे, असे स्लोगन असलेले सेल्फी पॉइंट आहेत. साहित्यावर ऊन, वारा, पावसाचा परिणाम होणार नाही. यातील ‘I LOVE DHULE‘ या स्लोगनच्या सेल्फी पॉइंटचे मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ उद्घाटन झाले. श्री. भोसले, गिरीश भामरे, वसीम बारी, संजय माळी, रजनीश निंबाळकर, राजेंद्र सोलंकी, डॉ. भूषण गवळे, डॉ. हर्शल भामरे, दीपक देवरे, महिला शहराध्यक्षा सरोज कदम, ॲड. तरुण पाटील, संगीता खैरनार, दीपिका भुदेका, शोभा आखाडे, शकिला बक्ष, वर्षा सूर्यवंशी, रुपाली झाल्टे, संगीता बोरसे, जया साळुंके, सुभाष पाटील, वामन मोहिते, मंगेश जगताप, भिका नेरकर, शशिकांत काटे, अनिकेत माईनकर, सागर चौगुले, मोहित पाटील, वाल्मीक मराठे, कार्तिक मराठे, एजाज शेख, जयदीप बागुल, दानिक पिंजारी, मुख्तार मन्सुरी, पिंटू चौधरी, जुनेद शेख, कुंदन पवार आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

२५ हजार नागरीकांनी घेतली सेल्‍फी
सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर पडावी, नागरिकांना अशा सेल्फी पॉइंटवर येऊन आनंद घेता यावा व त्या माध्यमातून नागरिकांना जिल्ह्यासह शहराचा अभिमान वाटावा या हेतूने सेल्फी पॉइंट उभारण्यात येत आहेत. याठिकाणी वर्षभरात सुमारे २५ हजार नागरिक सेल्फी घेतील, असा विश्वास श्री. भासले यांनी व्यक्त केला. 

संपादन ः राजेश सोनवणे