
त्या मोरांबरोबरच इतर मोरही त्या झोपडीवर जमतात. पावरा त्यांना भरवितातही. अंगा खाद्यावरही खेळवितात. एवढा लळा लागला आहे.
कापडणे (धुळे) : नाणे जमविणे, तिकिटे संग्रहीत ठेवणे, पुस्तके जमा करणे, विविध बियाणे जमविणे, कुत्रे व मांजरचे पालन करणे आदी प्रकारचे छंद जोपासणाऱ्यांची कमी नाही. पण शेती शिवारात राहून छंद जोपासणारे दुर्मिळच असतात. धनूर शिवारातील बाळा पावरा यांनी जखमी मोरावर उपचार केले. त्या मोरांबरोबरच इतर मोरही त्या झोपडीवर जमतात. पावरा त्यांना भरवितातही. अंगा खाद्यावरही खेळवितात. एवढा लळा लागला आहे.
दोन मोर एक लांडोर
बाळा पावरा धनूर शिवारात राहतात. जखमी झालेल्या मोराच्या पायावर उपचार केलेत. त्यानंतर आणखी एक मोर आणि लांडोर त्यांच्याबरोबरच हिंडू फिरु लागले. पावरासह चौघांचे सुर जुळलेत. शिवारातील मोरांचा थवाही त्यांच्याभोवती जमू लागला आहे.
कोंबड्यांमध्ये खेळतात मोर
दोन मोर आणि लांडोर हे पावरा कुटूंबाबरोबरच हिंडतात फिरतात. हे कुटूंब कामात गुंतलेले असते. त्यावेळी हे मोर कोंबड्यांसोबत खेळतात अन हिंडतही असतात. पावरा हे मोरांच्या आहाराकडे स्पेशल लक्ष घालतात. त्यांना द्राक्ष, बोर, बाजरी, तांदुळ हा आहार नियमित पुरवितात.
फिरतात मोरांची शिकार करणारे
कापडणे, धनूर, न्याहळोद, कौठळ, तामसवाडी शिवारात मोरांचा रहिवास अधिक प्रमाणात वाढला आहे. या शिवारांमध्ये अज्ञात रानटी डुक्करांची शिकाराबरोबर मोरांची शिकार करणारेही फिरत असल्याचे सांगितले जाते. या शिकारीवर पायबंद घालणे आवश्यक आहे. अन्यथा गेल्या तीन वर्षांपासून पशू पक्षांचा वाढलेला रहिवास कमी होण्याची भिती पशूपक्षी व पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे