esakal | चैत्र नवरात्रीचा नवस अधुराच; ना शेंडी ना जाऊळ
sakal

बोलून बातमी शोधा

navratrosav

चैत्र नवरात्रीचा नवस अधुराच; ना शेंडी ना जाऊळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कापडणे (धुळे) : कोरोना लॉकडाउनमुळे चैत्र नवरात्र महोत्सव रद्द झाला आहे. मंदिरे बंद आहेत. मात्र काकड आरतीसह सायंकाळची आरती व विधी पुजारी करीत आहेत. चैत्र महोत्सवाची पाचवी माळ झाली. विविध कुलस्वामिनींच्या मंदिरात पूजारींनी पांढरा खण साडीचा आहेर अर्पण केला. अन्‌ मूर्तींना नेसविलेला होता. तर सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना चैत्र नवरात्रीतील नवस फेडण्यास मुरड बसली आहे. नो शेंडी नो जाऊळ असेच म्हणावे लागणार आहे.

सोशल मीडियाचा खुबीने वापर

विविध कुलस्वामिनींच्या मंदिरावर पुजारी दोन्ही वेळच्या पूजा विधी करीत आहेत. चैत्र नवरात्रीतील प्रत्येक माळेच्या रंगानुसार आहेर परिधान केला जात आहे. पूजाविधी आणि मूर्तीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. भाविकांना घरी बसल्या कुलस्वामिनींचे दर्शनाची सोय काही विश्वस्तांनी करून दिली आहे.

भाविकांमध्ये समाधान

बऱ्यायाचशा भाविक महिलांनी नवरात्रीची ज्योत घरी देव्‍हाऱ्यात लावली आहे. घरीच पूजाविधी करून समाधान मानले आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे साकडेही घातले आहे. चैत्र नवरात्रीत कुलदेवतेला बालकांची शेंडी व जाऊळ अर्पण केली जात असते. गतर्षी लॉकडाउनमुळे खोळंबलेले कार्यक्रम यावर्षीही होणार होते. कोरोनाने बिकट स्थिती निर्माण झाल्याने लॉकडाउन सुरू आहे. भाविकांना यावर्षीही नवस फेडता येणारे नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. म्हणजेच यावर्षीही नो शेंडी नो जाऊळ असेच म्हणावे लागणार आहे.