फेब्रुवारीतील अवकाळी पाऊस; धुळे जिल्‍ह्‍यात 94 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान 

Untimely rain
Untimely rain

चिमठाणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस व वारावादळ गारपीटीत जिल्ह्यात एकूण 16 हजार 79 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले 9 हजार 380 हेक्टवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून मदतीसाठी 10 कोटी 99 लाख 51 हजार 980 रूपये निधी अपेक्षित आहे. सर्वात जास्त नुकसान शिंदखेडा तालुक्यातील 99 गावात तर सर्वात कमी नुकसान धुळे तालुक्यातील एका गावात झाले आहे. 
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तोंडांशी आलेला गहू, दादर , हरभरा, कांदा, रब्बी ज्वारी, भाजीपाला, केळी, पपई, डाळींब, मिरची, बाजरी पिकांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या 9 हजार 380 हेक्टर क्षेत्र असून 16 हजार 79 शेतकऱ्यांना 10 कोटी 99 लाख 51 हजार 948 रूपये मदतीसाठी लागणार आहेत. जिरायत पिकाखालील बाधीत दोन हजार 512.91 हेक्टर क्षेत्र असून चार हजार चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून मदतीसाठी एक कोटी 70 लाख 87 हजार 788 रूपये निधी अपेक्षित आहे. 

फळपिकाचे ३४ हेक्‍टर बाधित
बागायती पिकाखालील सहा हजार 832.68 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून बारा हजार 40 शेतकऱ्यांना मदतीसाठी नऊ कोटी दोन लाख 24 हजार 118 रूपये तसेच फळपिका खालील 34.61 हेक्टर असून 35 शेतकऱ्यांसाठी सहा लाख 22 हजार 980 रूपये मदतीसाठी लागणार आहेत. 

17 ते 19 फेब्रुवारी बाधीत 33 टक्के वरील क्षेञ व लाभार्थी संख्या 
पिक...33 टक्केवरील क्षेत्र... बाधीत शेतकरी 

गहू……. 5853.40...….. 10,232
रब्बीज्वारी..1830.58......... 2,901
कांदा……. 939.96...……. 1,718
मका……. 575.10...……... 895
हरभरा……. 99.30...……... 189
डाळींब………. 14...………. 14
पपई………. 17.16...……... 13
भाजीपाला इतर...३6.62...…... 84 
बाजरी……... 10.03...……. 24
केळी………... 3.45...…….. 8
मिरची……….. 0.60...…….. 1

एकूण………. 9380...…... 16,079
 

तालुका बाधीत गावे शेतकरी अपेक्षित निधी
धुळे 1 5 28,350
साक्री 12 2,366 170,11,820
शिंदखेडा 99 12,781 878,12,774
शिरपूर 44 927 50,99,004

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com