Womens Day 2021 : पुरेशी शिक्षीत नाही पण वंचित अनिलला पोहचविले सुरक्षा दलात; आता सांभाळतेय गावची धुरा

womens day
womens day

कापडणे (धुळे) : आदिवासी समाजाच्या समस्या सोडविणे. त्यांच्या हक्कासाठी लढणे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास काम करणे. दुसऱ्यांदा निवडून येत थेट सरपंच पदापर्यंत मजल मारली आहे. आदिवासी वंचितांना शाळेत दाखल करण्याठी धडपड सुरुच आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या अनिलला शिक्षणाचे धडे देत देशसेवेसाठी थेट सिमा सुरक्षा दलामध्ये दाखल केले आहे. आजही भाजीपाला विक्रीतून स्वतःचा उदरनिर्वाह चालवित आहे. ही कथा येथील प्रथम महिला आदिवासी सरपंच सोनीबाई भील यांची. त्यांचा जिवन प्रवास थक्क करणाराच आहे.

दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्या अन्‌
सरपंच भील या प्रथम 2000 मध्ये ग्रामपंचायतीत निवडून आल्या होत्या. तेव्हाही गाव विकासासाठी महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. 2009-10 मध्ये जिल्हा परीषद निवडणूक लढविली होती. त्यावेळी प्रयत्न अपुर्ण पडले असल्याचे सरपंच भील यांनी सांगितले. आता अधिक मताधिक्याने निवडून आल्यात. बिनविरोध सरपंच झाल्या आहेत. आता मात्र पंधरा वर्षांपुर्वी राहिलेली कामे करण्याचा आणि विकास कामांसाठी अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. 

वंचितांना शिकविण्याचा छंद
सरपंच भील यांना परीस्थिती अभावी अधिक शिक्षण घेता आले नाही. ही मनातील सल त्यांनी वंचितांना शिक्षण देवून काढली आहे. नात्यातीलच पण शिक्षणापासून वंचित राहतील हे लक्षात आल्याबरोबर त्यांना शिक्षण देत आहेत. यात वैशाली भील, विद्या भील, उज्वला भील, कविता भील, अजय भील, पुजा भील कल्याणी भील, विजय भील, अर्चना भील व अनिल भील यांचा समावेश होतो. अनिल भील याच्या मनात देशसेवेची आवड निर्माण करुन सीमा सुरक्षा दलात दाखल केले आहे. यात अनिलची जिद्दही महत्वपुर्ण आहेच.

आताही भाजीपाला विक्रीतून उदरनिर्वाह
सरपंच भील या गेल्या तीस वर्षांपासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सरपंच झाल्यानंतरही वेळ काढीत व्यवसाय सुरु ठेवला आहे. गावासाठी अधिक वेळ देण्यासाठी कटीबध्दही आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com