अवघ्या ५६ हजारासाठी साडेतीनशे कोटीचा प्रकल्प अंधारात

अवघ्या ५६ हजारासाठी साडेतीनशे कोटीचा प्रकल्प अंधारात
sarangkheda project tapi river
sarangkheda project tapi riversarangkheda project tapi river

सारंगखेडा (नंदुरबार) : अवघ्या ५६ हजार रूपयांसाठी तापी नदीवरील (Tapi river) सारंगखेडा बॅरेजवरील (Sarangkheda barrage) वीज पुरवठा विज वितरण कंपनीने (Mahavitaran) दोन महिन्यापासून खंडीत केली आहे. तर प्रकल्पावरील सीसीटीव्ही कॕमेरे बंद अवस्थेत आहे. दुसरीकडे सुरक्षा रक्षकांचे वेतन आठ महिन्यांपासून दिले नसल्याने बॕरेजची रात्रीची सुरक्षा व्यवस्थाही ऐरणीवर आली आहे. पण प्रकल्पाचे दायित्व असलेल्या तापी खोरे विकास महामंडळाचे अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे साडेतीनशे कोटींच्या या प्रकल्पाबाबतीत काही अघटीत घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (sarangkheda project tapi river connection cut mahavitaran)

५६ हजारांसाठी अंधार

सारंगखेडा येथील तापी नदीवर जलसिंचनासाठी २००८ ला सारंगखेडा बॕरेजचा प्रकल्प उभारण्यात आला. त्याद्वारे तापीचे पाणी अडविले जात आहे. पावसाळ्यानंतर ११ मीटर पाणी साठा अडविण्यात येतो. उन्हाळयात पाण्याची पातळी कमी होते. मात्र प्रकल्पस्थळी सुविधांचा मोठा अभाव आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दोन- तीन महिने विज बिल न भरल्यास विज वितरण कंपनी प्रकल्पाचा विज पुरवठा खंडीत करतात. असा प्रकार वारंवार होत असतो. यावेळी ५६ हजार रुपयांचे विज बिल थकल्याने विज वितरण कंपनीने दोन महिन्यापूर्वी तेथील विज पुरवठा खंडीत केला आहे. दोन महिन्यापासून ३५० कोटीचा प्रकल्प अंधारात आहे. त्यामुळे रात्रीची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे.

sarangkheda project tapi river
प्रथम तरतूद; नंतर अंदाजपत्रकातून गायब ! आणि सदस्यांचा संताप

सुरक्षा रक्षकांना पगार नाही

प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंना रात्री व दिवसा सुरक्षा रक्षक आहेत. मात्र त्यांना गत आठ महिन्यापासून पगार मिळालेला नाही. तरीही ते काम करीत आहेत. मात्र रात्री विज नसल्याने प्रकल्पाजवळ हिस्त्र प्राणी, साप आदींचा वावर असल्याने सुरक्षा रक्षकांना रात्र भीतीने काढावी लागते. त्यामुळे सुरक्षा रक्षकच असुरक्षित असल्याचे दिसून येते.

सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात

प्रकल्पाच्या सुरक्षतेसाठी ठिकठिकाणी चार वर्षांपूर्वी चांगल्या दर्जेच्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र दोन वर्षापासून तेही बंद अवस्थेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात आहेत. त्यामुळे प्रकल्पाजवळ कोण येत आहे, कोण पाण्यात उडी घेत आहे हे दिसत नाही. अनेक वेळा आत्महत्या करणारे ही येथूनच उडी घेतात. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून यंत्रणा बसविण्यात आली असतांनाही उपयोगात येत नसल्याचे चित्र आहे. शिवाय टीव्ही स्क्रीनदेखील बंद अवस्थेत आहे.

तापी खोरे विकास महामंडळाच्या यांत्रीकी विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे, विज पुरवठा तसेच प्रकल्पाची यांत्रीक देखभाल दुरूस्तीची जबाबदारी आहे. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तर सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षकांना वेतन अदा केले जाते. मात्र त्या मंडळाने रक्षकांनाच वाऱ्यावर सोडले आहे.

sarangkheda project tapi river
मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

सारंगखेडा प्रकल्पाचे ५६ हजार रुपये विज बिल थकले आहे. वरिष्ठांच्या आदेशाने गेल्या दोन महिन्यापूर्वी विज पुरवठा खंडीत केला आहे. वीज बिल भरल्यावर वीज पुरवठा जोडण्यात येईल.

- टी. एन. मन्सूरी, कनिष्ठ अभियंता, विज वितरण कंपनी, सारंगखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com