ना ढोलांचा आवाज, ना बिरीचा सुर गुंजणार..सातपुड्यात होलिकोत्सव पर्वाला उद्यापासून प्रारंभ

nandurbar holi
nandurbar holi

नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासी समाजातील संस्कृती, धार्मिक माहात्म्य व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या तसेच नवचैतन्य निर्माण करणाऱ्या होलिकोत्सव हा आदिवासी समाजासाठी आनंदपर्वणीच असते. अशा या आनंद पर्वणीवर कोरोनाने मात्र पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शासन-प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत या वर्षी होलिकोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सातपुड्यातील जनतेने घेतला आहे. त्यामुळे यंदाचा होलिकोत्सवात ना लाखोंचा जनसागर असणार आहे. ना ढोल ताशांचा नाद, ना बिरीचे सुर गवसणार आहे. अशा वातवरणातच गुरुवार (ता. २५) पासून सातपुड्याचा होलिकोत्सवाला प्रारंभ होत आहे. 

नंदुरबार जिल्हा आदिवासी व मागासलेला जिल्हा म्हणून शासन दरबारी ओळखला जात असला तरी या जिल्ह्यातील आदिवासी परंपरा व संस्‍कृतीचे दर्शन साऱ्या देशालाच नव्हे, तर साता समुद्रापार परदेशातील जनतेलाही मोहून टाकणारे आहे. त्यातीलच होलिकोत्सव हा सण एक आगळा वेगळा आहे. जिल्ह्यातीलच नाही, तर साऱ्या देश- परदेशातील नागरिकांनी आकर्षण असलेला हा सण म्हणजे साऱ्यांसाठी आनंद पवर्णीच असते. 
आठ दिवस चालणारा हा उत्सवासाठीची तयारी महिनाभरापासून सुरू होते. सातपुड्यातील स्थलांतरित झालेल्या मजुरांपासून तर काम- व्यवसाय, नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले प्रत्येक जण गावी परततात. त्यामुळे एरवी सन्नाटा असलेल्या गाव -पाड्यांमध्ये चैतण्य निर्माण होते. 

असे असते आकर्षण
होलिकोत्सवातील खास आकर्षण म्हणजे ढोल नृत्य. भले मोठे ढोल, बिरीचा मधुर सूर आणि त्याचा तालावर ठेका धरणाऱ्या आबालवृद्धांची नृत्यकला साऱ्यांनाच ठेका धरायला लावणारी असते. होळी प्रत्येक गावात होते. मात्र त्यातच मानाच्या होळी काही ठिकाणी सार्वजनिकरीत्या साजरी केली जाते. जसे अककलकुवा तालुक्‍यातील डाब येथे पहिली होळी पटेविली जाते. त्यानंतर काठी येथील राजवाडी होळी असते. त्यानंतर असली येथे आदिवासी विकासमंत्री यांच्या गावी नवसाची होळी पेटविली जाते. होळी ही देवी असून य देवीला सातपुड्यातील बांधव आपल्या संकटांना दूर करण्यासाठी व कौटुंबिक शांतीसाठी नवस बोलतात. त्यात बावा, बुध्या असे रूप धारण करून कडक तपस्या करून होलिकोत्सवात ते नवस फेडतात. 

काठीची राजवाडी होळी
काठीची राजवाडी होळीसाठी दरवर्षी देश-परदेशातून नागरिक येतात. रात्रभर आदिवासी पांरपारिक नृत्य, ढोल स्पर्धा यासह विविध कार्यक्रम चालतात. नवस फेडणारे रात्रभर पूजाविधी करतात. मध्यरात्री होळी पेटवून तिचा भोवती घेर धरून महिला-पुरूष नाचतात. त्या आनंदात सहभागी होण्यासाठी सातपुड्यातील दऱ्या कपाऱ्यातील अबालवृध्ंचे पावले राजवाडी होळी पाहण्यासाठी व दशर्नासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात. अशा या होलिकोत्सवील आनंद पर्वणीला कोरोनाची नाट लागली आहे. 

शांततेत होणार होलिकोत्‍सव 
कोरोनामुळे होलिकोत्सव न साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र सातपुड्यातील होलिकोत्सव ही आदिवासी समाजाची संस्कृती व परंपरा आहे. ते खंडीत होऊ नये, म्हणून शासन-प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत केवळ स्थानिक रहिवाशांचा उपस्थितीत व नवस, पूजा विधी करणाऱ्यांचा उपस्थितीत होळी साजरी करण्याचा ठराव सातपुड्यातील जनतेने केला आहे. त्यासाठी बाहेरून कोणालाही आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे भव्य स्वरूपात होणाऱ्या या उत्सवावरही मर्यादा आली आहे. 

महत्त्वाच्या होळी 
२४ मार्च डाब, २७ मार्च असली, २८ मार्च काठी (राजवाडी होळी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com