तयारी खरीपाची..नंदुरबारसाठी २१ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

खरीप हंगामाची तयारी..नंदुरबार जिल्ह्यासाठी २१ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
demand seeds
demand seedssakal

तळोदा (नंदुरबार) : खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) शेतकरी कामाला लागला असून कृषी विभागाने महाबीजकडे ५ हजार ८९० क्विंटल तर खाजगी कंपन्यांकडे १६ हजार ०९३ क्विंटल अशी एकूण २१ हजार ९८३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांना (Farmer) वेळेवर बियाणे उपलब्ध होत जिल्ह्यात कोठेही बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही; याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (nandurbar agricalture department demand cotton seeds farmer)

demand seeds
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता दुपारी एकपर्यंत खुली

यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याच्या अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी बांधवांचा उत्साह वाढला असून कोरोनाचे सावट बाजूला सारत बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी शेतकरी बियाण्यांची खरेदी करतांना दिसत आहे.

मक्‍याची मागणी अधिक

शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा कृषी विभागामार्फत महाबीज व खाजगी कंपन्यांकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाजरी, तूर, मुग, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांचे लागवडीच्या प्रमाणात दरवर्षी घट येत असल्याने या पिकांसाठी त्यानुसार कमी बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, भात, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता लक्षात घेता मक्यासाठी ५५५० क्विंटल, सोयाबीनसाठी ४९०० क्विंटल, भातसाठी ३३२७ क्विंटल, ज्वारीसाठी ३३०० क्विंटल व कापूससाठी २७५२ क्विंटलची मागणी कृषी विभागामार्फत महाबीज व खाजगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

अनधिकृत बियाण्यांची गंभीर बाब

'नेमीची येतो पावसाळा' या उक्ती प्रमाणे कृषी विभाग दरवर्षी लागणाऱ्या बियाण्यांची मागणी नोंदवण्याचा सोपस्कार पार पाडून ते बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देते. मात्र अनधिकृत बियाणे विक्रेत्यांवर कारवाईसाठी पुढे येण्यासाठी धजावत नाही- त्यामुळेच दरवर्षी जिल्ह्यात शेकडो एकरावर अनधिकृत बियाणे अंकुरते. यामुळे जिल्हा कृषी विभागाने या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com