खासदार गावितांच्या तक्रारीमुळे रेमडेसिविर वाटप बंद; माजी आमदार रघुवंशी यांचा आरोप

रेमडेसिव्हिर वाटप बंद झाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत
chandrakant raghuwanshi heena gavit
chandrakant raghuwanshi heena gavitchandrakant raghuwanshi heena gavit

नंदुरबार : रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्हयातील गरजूंना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची सोय केली होती. परंतु खासदार डॉ. हिना गावित यांच्या तक्रारींमुळे रेमडेसिव्हिर वाटप बंद झाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

आम्ही रुग्णसेवा प्रामाणिकपणे केली आहे. तक्रारीची चौकशी होऊ द्या. चौकशांना कधीही घाबरलो नाही असेही श्री. रघुवंशी यांनी म्हटले आहे. याबाबत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की रोटरी वेलनेस सेंटरने ५ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकत आणले होते. त्यातील १ हजार इंजेक्शन शासनाने उपलब्ध करून दिले. शासनाकडून घेतलेले १ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन ५९४ रुपयांना घेतले; तेच आम्ही ५५० रुपयांना रुग्णांना उपलब्ध करुन दिले.

सेवा म्‍हणून दिल्‍याची चुक केली का?

मागील कालावधीत १५०० रुपयांना घेतलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन अवघ्या १२०० रुपयांना दिले. त्याचप्रमाणे १७०० रुपयांचे रेमडेसीव्हिर १५५० रुपयांना म्हणजेच सेवा म्हणून कमी भावात दिले यात काय चूक केली? परंतु, स्वतः काही करायचं नाही आणि काम करणाऱ्यांचे पाय खेचून राजकारण करायचे हे योग्य नव्हे. धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी ५ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन जिल्हाधिकारी यादव यांना सुपूर्द केले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी ७ हजार तेथे स्थानिक ठिकाणी वाटप केले; तर भाजप नेते खासदार सी. आर. पाटील दररोज ५ हजार इंजेक्शनचे वाटप करत आहेत. मग खासदार डॉ. हिना गावित यांनी रेमडेसिव्हिरचे वाटप का केले नाही. असा प्रश्न माजी आमदार श्री. रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे.

रेमडेसिव्हिर वाटपात भेदभाव नाहीच

जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना रेमडेसिविर वाटप करत असतांना भेदभाव केला नाही. याउलट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वात जास्त उपलब्ध करून दिले. कोरोना पक्ष, जात, धर्म पाहून होत नाही. रोटरी वेलनेस सेंटरचे रेमडेसिविर वाटपाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असतांना खासदार डॉ. हिना गावित यांनी तक्रार केल्यामुळे ते बंद पडले आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबातील गरीब रूग्णांना भोगावा लागत आहे. आज रुग्णांना गैरसोयचा सामना करावा लागत असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे.

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com